आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 मृत्यू दर कमी करण्यासंबंधी सर्व प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश


सर्वाधिक कोविड मृत्यू असलेल्या राज्यांनी वैद्यकीय व्यवस्थापन सुधारण्यासाठी संसाधनांचा योग्य वापर करण्याची गरज

Posted On: 08 AUG 2020 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2020

 

केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी केलेल्या कोविड-19 च्या समन्वित, श्रेणीबद्ध आणि सक्रिय व्यवस्थापनामुळे राष्ट्रीय मृत्यु दर (सीएफआर) कमी होत आहे. सध्या हा दर  2.04% आहे. कोविड-19 च्या एकत्रित व्यवस्थापनासाठी राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या नियमित आढावा आणि मार्गदर्शन प्रक्रियेचा भाग म्हणून, 7आणि 8  ऑगस्ट रोजी आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली दोन उच्च स्तरीय आभासी बैठका आयोजित करण्यात आल्या. ज्या राज्यांमध्ये कोविड रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे अशा राज्यांना यात सहभागी करून घेण्यात आले आणि कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण रोखण्याच्या आणि कमी करण्याच्या प्रयत्नांबाबत त्यांना सल्ला आणि सूचना देण्यात आल्या.

आजची बैठक आठ राज्ये / केंद्रशासित प्रदेशामधील 13 जिल्ह्यांवर केंद्रित होती. यामध्ये आसाममधील कामरूप मेट्रो; बिहारमधील पाटणा; झारखंडमधील रांची; केरळमधील अलाप्पुझा आणि तिरुवनंतपुरम; ओदिशामधील गंजम; उत्तर प्रदेशमधील लखनऊ; पश्चिम बंगालमधील 24  परगणा उत्तर, हुगळी, हावडा, कोलकाता आणि मालदा; आणि दिल्ली यांचा यात समावेश होता. या जिल्ह्यांमध्ये भारतातील जवळपास 9% सक्रिय रुग्ण आहेत आणि कोविड मृत्यूंपैकी 14% मृत्यू येथे झाले आहेत. तसेच या जिल्ह्यांमध्ये प्रति दशलक्ष चाचण्यांचे प्रमाण कमी असून रुग्ण बाधित आढळण्याचे प्रमाण अधिक आहे. आसाममधील कामरूप मेट्रो; उत्तर प्रदेशमधील लखनऊ; केरळमधील तिरुअनंतपुरम आणि अलप्पुझा या चार  जिल्ह्यांमध्ये दररोज नवे रुग्ण आढळण्यात वाढ दिसून आली आहे. या आभासी बैठकीत जिल्हा देखरेख अधिकारी, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह आठ राज्यांतील प्रधान सचिव (आरोग्य) आणि संचालक (एनएचएम) सहभागी झाले होते.

बैठकी दरम्यान कोविड मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. आरटी-पीसीआरसाठी दररोज 100 पेक्षा कमी आणि इतरांसाठी 10; प्रति दहा लाख लोकसंख्येमागे कमी प्रमाणात चाचण्या; गेल्या आठवड्यापासून परिपूर्ण चाचण्यांमध्ये घट; चाचणी अहवालांना विलंब आणि आरोग्य सेवा कामगारांमधील संसर्गाचे अधिक प्रमाण यांसारख्या प्रयोगशाळा वापराशी संबंधित समस्यांवर राज्यांना मार्गदर्शन करण्यात आले. काही राज्यांमध्ये रुग्णालयात दाखल केल्याच्या 48 तासाच्या आत मरण पावलेल्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर बाधित रुग्णांची वेळेवर नोंद आणि रुग्णालयात दाखल करण्याबाबत सूचना करण्यात आली. तसेच नकार देणाऱ्या शून्य सहिष्णुता असलेल्या रुग्णवाहिकांची अनुपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश राज्यांना देण्यात आले. दैनंदिन आधारावर प्रत्यक्ष भेटी / दूरध्वनीद्वारे सल्लामसलत यावर विशेष भर देऊन लक्षणे न आढळलेल्या रुग्णांचे घरीच अलगीकरण करून त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित केली गेली. प्रचलित रुग्णांचे प्रमाण आणि अंदाजित वाढीच्या दराच्या आधारे राज्यांना वेळेत मूल्यांकन करण्याची आणि आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा इत्यादी पायाभूत सुविधांसाठी आगाऊ तयारी करण्याची सूचना देण्यात आली

नवी दिल्लीतील एम्स, आठवड्यातून दोनदा मंगळवार आणि शुक्रवारी आभासी सत्रांचे आयोजन करते ज्यामध्ये डॉक्टरांचे तज्ञ पथक दूरध्वनी / व्हिडिओच्या माध्यमातून सल्लामसलतीद्वारे वेगवेगळ्या राज्य रुग्णालयांच्या आयसीयूमधील कोविड रूग्णांच्या प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापनाविषयी आणि मृत्युदर कमी करण्याबाबत मार्गदर्शन करते. वैद्यकीय पद्धती सुधारण्यासाठी राज्यातील सर्वोत्कृष्ट केंद्र असलेली रुग्णालये नियमितपणे या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हावीत यासाठी राज्य प्रशासनांना सूचना देण्यात आल्या. वाढते रूग्ण आणि गंभीर रुग्णांकडे विशेष लक्ष देण्यावर भर देताना वैद्यकीय व्यवस्थापनासह प्रतिबंधित आणि बफर झोनच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी मंत्रालयाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला. आणखी एक प्रमुख विषय हा होता की, उच्च-जोखीम असणार्‍या लोकांमध्ये म्हणजे इतर गंभीर आजार, गर्भवती महिला, वृद्ध आणि मुले यांच्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवण्यामुळे मृत्यू टाळता येतात.

कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/ आणि @MoHFW_INDIA

तांत्रिक बाबींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास,  technicalquery.covid19[at]gov[dot]in या ईमेल आय डी वर साधावा:आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in आणि @CovidIndiaSeva .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 किंवा 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1644415) Visitor Counter : 265