रसायन आणि खते मंत्रालय

एप्रिल-जुलै 20 मध्ये एनएफएलची एकूण खतांची विक्री 18.79 लाख मे.टन या उच्चांकी पातळीवर पोहचली

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2020 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2020


नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) च्या एकूण खत विक्रीने एप्रिल ते जुलै 20 मध्ये  18.79  लाख मेट्रिक टन ही उच्चांकी पातळी गाठली आहे, जी गेल्या वर्षीच्या 15.64 लाख मे. टन विक्रमी पातळीपेक्षा 20% ने अधिक आहे. या कालावधीत युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी आणि बेंटोनाइट सल्फरच्या विक्रीचा यात समावेश आहे.

एनएफएलच्या निवेदनानुसार यामध्ये कंपनीचे मुख्य उत्पादन असलेल्या युरियाने 15.87 लाख मे. टन विक्रीची नोंद केली आहे जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील विक्रीपेक्षा 17% ने अधिक आहे.

उत्साहवर्धक आकडेवारीमुळे आनंदित झालेले अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  व्ही. एन. दत्त यांनी कोविड -19 चे निर्बंध असूनही "किसान " खतांचे विक्रमी संख्येने यशस्वी वितरण केल्याबद्दल विपणन गटाचे अभिनंदन केले आहे.

एनएफएलचे  पाच यूरिया उत्पादन प्रकल्प आहेत, पंजाबमधील नांगल आणि भटिंडा येथे प्रत्येकी एक, हरियाणामधील पानिपत येथे एक आणि मध्य प्रदेशात विजापूर येथे दोन प्रकल्प आहेत. कंपनीची यूरिया उत्पादन क्षमता वार्षिक 35.68 लाख मे.टन आहे. युरिया, बायो फर्टिलायझर्स आणि बेंटोनाइट सल्फर सारख्या त्यांच्या स्वत: च्या उत्पादनांव्यतिरिक्त, कंपनी शेतकऱ्यांना एका छताखाली सर्व प्रकारच्या खतांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने विविध जटिल खतांचा व्यापार करते.

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1644221) आगंतुक पटल : 177
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , हिन्दी , Manipuri , Punjabi , Telugu , Malayalam