आदिवासी विकास मंत्रालय

ट्रायफेडने 33 व्या वर्धापन दिनानिमित्त आदिवासी सामाजिक-आर्थिक विकासासाठी स्वतःचे व्हर्च्युअल ऑफिस नेटवर्क सुरू केले

Posted On: 07 AUG 2020 5:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020

आदिवासी व्यवहार मंत्रालयांतर्गत असलेल्या आदिवासी सहकार विपणन विकास मंडळाने (ट्रायफेड) 6 ऑगस्ट 2020 रोजी 33 व्या वर्धापनदिनानिमित्त आदिवासींच्या जीवनात परिवर्तन करण्याच्या कटीबद्धतेचा पुनरुच्चार केला. उद्योग आणि व्यापाराच्या माध्यमातून आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी स्थैर्याने कार्य करणे, विशेषतः सध्याच्या आव्हानात्मक काळात आदिवासींना रोजगार आणि उपजिविकेच्या संधीमध्ये मदत करण्यासाठीचे प्रयत्न ट्रायफडने दुप्पट केले आहेत.

बहुतांश लोकांनी सध्याच्या संक्रमणपरिस्थितीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात खरेदी, बँकींग, नियमित कामकाजासाठी ऑनलाईन पद्धतींचा स्वीकार केला आहे. टाळेबंदीचे नियम शिथील केल्यानंतर यात आणखी वाढ होताना दिसत आहे. पुरवठ्याच्या बाजूची परिस्थिती पाहता, कोविड-19 संकटामुळे गरीब आणि वंचित समुदायाच्या उपजिविकेला मोठी झळ बसली आहे, आदिवासी कारागिर आणि गौण वन उत्पादन गोळा करणाऱ्यांचाही यात समावेश आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ट्रायफेडला एका रणनितीची आवश्यकता होती. यामुळेच आमचे डिजीटलीकरण महत्त्वाचे ठरते, असे ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा म्हणाले.

महामारीचा देशभर प्रसार झाला आहे, त्यामुळे बहुतांश बाबी ऑनलाईन झाल्या आहेत. ट्रायफेडने 6 ऑगस्ट 2020 रोजी 33 व्या वर्धापनदिनानिमित्त स्वतःचे आभासी कार्यालय सुरु केले. ट्रायफेड आभासी कार्यालय 81 ऑनलाईन वर्कस्टेशन्स आणि ट्रायफेड योद्ध्यांच्या मदतीसाठी राज्य आणि विविध संस्थांचे देशभरात अतिरिक्त 100 वर्कस्टेशन्स असणार आहेत. मिशन मोडवर काम करुन आदिवासींना मुख्य विकासप्रवाहाकडे आणण्यासाठी सर्व काम करतील.

कर्मचाऱ्यांच्या सहभागितेचे प्रमाण मापन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रयत्नांना सुलभ करण्यासाठी, डॅशबोर्ड लिंकसह कार्य वितरण मॅट्रिक्स देखील सुरू करण्यात आले आहेत. राज्यांना लागणाऱ्या सॉफ्टवेअरचाही शुभारंभ करण्यात आला.

अशाप्रकारचे संघटनात्मक उपक्रम ट्रायफेडच्या महत्वाकांक्षी सर्वसमावेशी डिजीटलीकरण मोहिमेचा भाग आहेत, ज्यातून ग्राम-आधारीत आदिवासी उत्पादक आणि कारागीर यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांनूसार अत्याधुनिक ई-प्लॅटफॉर्मचा वापर होईल. 

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644143) Visitor Counter : 119