पर्यटन मंत्रालय

स्वातंत्र्यदिनानिमित्त पर्यटन मंत्रालय देखो अपना देश वेबिनार मालिकेअंतर्गत पाच वेबिनारचे आयोजन करणार

Posted On: 07 AUG 2020 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2020

1947 मध्ये मिळवलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा आदर करण्यासाठी देशातील  लोकांनी अभिमानाने एकत्रित येऊन राष्ट्रगीताचा गजर करण्याची वेळ आली आहे. देशाच्या इतिहासात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे असाधारण महत्त्व आहे आणि भूतकाळातील कोणत्याही महत्वपूर्ण घटनेपेक्षा याचे मूल्य अधिक आहे. 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय राजधानीत ध्वजारोहण करुन यावर्षीचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येईल, तसेच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि जगातील भारतीय दूतावासांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येईल. 15 ऑगस्ट 2020 रोजी 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी राष्ट्र सज्ज होत आहे, केंद्रीय पर्यटन मंत्रालयानेही देखो अपना देश वेबिनार मालिकेअंतर्गत पाच वेबिनारचे आयोजन करुन सर्वात महत्त्वपूर्ण दिवसाचा सन्मान करण्याचे ठरवले आहे.

हे वेबिनार्स स्वातंत्र्य चळवळीसंदर्भात, त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कोणी महत्त्वपूर्ण योगदान दिले, यावर असतील.

वेबिनार तपशील:

  • 8 ऑगस्ट 2020 (शनिवार) रोजी ‘मेमॉइर्स ऑफ 1857: अ प्रिल्युड टू इन्डिपेन्डन्स’ द्वारा श्रीमती निधी बन्सल, सीईओ, इंडिया सिटी वॉक्स & इंडिया विथ लोकल्स आणि डॉ सौमी रॉय, प्रमुख, आयडब्ल्युएल & आयएचडब्ल्यु. वेबिनारमध्ये सहभागासाठी https:/ /bit.ly/Memoirsof1857 वर नोंदणी करु शकता.
  • 10 ऑगस्ट 2020 (सोमवार) रोजी ‘सेल्युलर जेल: लेटर्स, मेमॉईर्स अँड मेमरीज’द्वारा श्रीमती निधी बन्सल, सीईओ, इंडिया सिटी वॉक्स & इंडिया विथ लोकल्स आणि डॉ सौमी रॉय, प्रमुख, आयडब्ल्युएल & आयएचडब्ल्यु आणि श्रीमती सोम्रिता सेनगुप्ता, सिटी एक्सप्लोरर, इंडिया सिटी वॉक्स.
  • 12 ऑगस्ट 2020 (बुधवार) रोजी ‘लेसर नोन स्टोरीज ऑफ इंडियाज स्ट्रगल फॉर इन्डिपेन्डस’’द्वारा श्रीमती अकीला रमन आणि श्रीमती नयनतारा  नायर, स्टोरीटेल्स.
  • 14 ऑगस्ट 2020 (शुक्रवार) रोजी ‘जालियनवाला बाग: अ टर्निंग पॉईन्ट इन दी फ्रीडम स्ट्रगल’ द्वारा श्रीमती किश्वर देसाई, अध्यक्ष, दी पार्टीशन म्युझिअम, अमृतसर.
  • 15 ऑगस्ट 2020 (शनिवार) रोजी ‘सरदार वल्भाई पटेल- आर्किटेक्ट ऑफ युनायटेड इंडिया द्वारा संजय जोशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी & मुख्य व्यवस्थापक, स्टॅच्यु ऑफ युनिटी, गुजरात सरकार.

सर्व सत्र सकाळी 11:00 वाजता सुरु होऊन दुपारी 12:00 वाजेपर्यंत चालतील.टाळेबंदीच्या सामाजिक अंतर नियमांचे पालन करत, पर्यटन मंत्रालयाने या महत्वपूर्ण घटनेसाठी आभासी माध्यमाच्या वापरास प्रोत्साहन दिले आहे, राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाच्या वेब आधारीत कॉन्फरन्सिंग साईटच्या माध्यमातून कोणालाही या वेबिनारमध्ये सहभागी होता येईल. नोंदणीसाठी अधिक माहिती incredibleindia.org, tourism.gov.in या संकेतस्थळांवर आणि Incredible India च्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे.

 

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644123) Visitor Counter : 124