कृषी मंत्रालय

कृषी मंत्रालय राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या नाविन्यपूर्ण आणि कृषीउद्यमशील  घटकांतर्गत स्टार्टअप्सना  वित्तपुरवठा

112 स्टार्टअप्सना 1185.90 लाख रुपये निधी याआधीच देण्यात आला असून याव्यतिरिक्त कृषी आणि संलग्न क्षेत्रातील 234 स्टार्टअप्सना 2485.85 लाख रुपये निधी पुरवला जाणार

Posted On: 06 AUG 2020 8:07PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकार कृषी क्षेत्राला  उच्च प्राधान्य देते. शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करुन देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हातभार लावण्यासाठी आणि तरुणांना रोजगार मिळावा यासाठी स्टार्ट अपना प्रोत्साहन दिले जात आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत  घटक, नाविन्यपूर्ण संशोधन  आणि कृषी-उद्योजकता विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या द्वारे नवसंशोधन आणि कृषी उद्यमशीलतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी आर्थिक मदत पुरवणे आणि इनक्युबेशन इकोसिस्टमला मदत केली जाणार आहे. हे  स्टार्ट-अप कृषी प्रक्रिया, कृत्रिम  बुद्धिमत्ता, डिजिटल शेती, शेती यांत्रिकीकरण, कचऱ्यापासून  संपत्ती, दुग्धव्यवसाय   मत्स्यपालनासारख्या  विविध क्षेत्रात  आहेत.

 

डीएसी आणि एफडब्ल्यूने उत्कृष्टता केंद्र म्हणून 5 नॉलेज पार्टनर्स (केपी)  निवडले आहेत. हे आहेत -

(1) राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज), हैदराबाद,

(2) राष्ट्रीय कृषी विपणन संस्था (एनआयएएम) जयपूर,

(3) भारतीय कृषी संशोधन संस्था (आयएआरआय) पूसा, नवी दिल्ली,

(4) कृषी विज्ञान विद्यापीठ, धारवाड, कर्नाटक आणि

(5) आसाम कृषी विद्यापीठ, जोरहाट, आसाम

 

देशभरातील 24 RKVY-RAFTAAR एग्रीबिजनेस इनक्यूबेटर (आर-एबीआय) देखील नियुक्त केले आहेत.

 

या योजनेचे घटक खालीलप्रमाणे आहेत:

कृषीउद्यमशीलतेची ओळख  -   रुपये 10,000 / - मासिक विद्यावेतनासह  दोन महिन्यांचा कालावधी. आर्थिक, तांत्रिक, आयपी इत्यादींबाबत  मार्गदर्शन केले जाते.

आर-एबीआय इन्क्युबेटर मधील स्टार्टअप्सना सीड स्टेज फंडिंग -  25 लाख रुपयांपर्यंत (85% अनुदान आणि इनक्युबेटकडून 15% योगदान) अर्थसहाय्य

कृषी उद्यमशीलतेच्या कल्पना  / प्री-सीड स्टेज फंडिंग -  5 लाख (90% अनुदान आणि इनक्युबेटकडून 10% योगदान) रुपयांपर्यंत अर्थसहाय्य

 

संस्था त्यांच्या कार्यक्रमांसाठी अर्ज मागवतात आणि वेगवेगळ्या टप्प्यांमधून निवड करण्याची कठीण  प्रक्रिया पार पाडल्यानंतर आणि दोन महिन्यांच्या प्रशिक्षणाच्या आधारे अनुदानपर मदतीद्वारे अर्थसहाय्य दिले जाणाऱ्या स्टार्ट-अपची अंतिम यादी निश्चित केली जाते. तांत्रिक, वित्त, बौद्धिक संपत्ती, वैधानिक अनुपालन  इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. टप्पे आणि टाइमलाइनचे निरीक्षण करून स्टार्ट अप्सचे मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा एक भाग आहे.

 

इन्क्युबेट केलेल्या काही स्टार्ट-अपनी पुढील उपाय सुचवले आहेत  -

व्हॅट्झ म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅक्टिक्स ऍनिमल  हेल्थ टेक्नोलॉजीज हे पशुवैद्यकीय डॉक्टरांचे एक नेटवर्क आहे जे ग्राहकांशी म्हणजेच पशु मालकांशी त्वरित संपर्क साधते म्हणजे रिअल टाइम दूरसंवाद  आणि घरी थेट भेट देते

एसएनएल इनोव्हेशन्स - इनो फार्म्स थेट शेतातच प्रक्रिया केलेला फळे आणि भाजीपाला लगदा पुरवतात . यासाठी मोनोब्लॉक फ्रूट प्रोसेसिंग प्लॅटफॉर्म (ऑन-व्हील्स) चा वापर करून फळांना एका वर्षापर्यंत टिकवण्यासाठी त्याचे पल्पमध्ये रूपांतर केले जाते

ईएफ पॉलिमरने शेतकर्‍यांचे पाणीटंचाईचे संकट दूर करण्याच्या उद्देशाने पर्यावरण -स्नेही वॉटर रिटेन्शन पॉलिमर विकसित केले. या स्टार्टअपने मातीतील पाणी शोषण्यासाठी, जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार पिकांना पुरवठा करण्यासाठी  एक सुपर अब्झोर्बान्ट पॉलिमर बनवला आहे.

ज्या स्टार्ट-अपची निवड केली गेली आहे त्यात ए 2 पी एनर्जी सोल्यूशनसारख्या स्त्रियांच्या नेतृत्वातील अनेक स्टार्ट-अप्स आहेत जे कचरा बायोमासचा शोध  घेण्यासाठी आणि नंतर तो गोळा करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतात . एकीकडे ते शेतकर्‍यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देते आणि दुसरीकडे ए 2 पी संकलित बायोमासला एनर्जी पेलेट्स , हरित  कोळसा आणि जैव तेलासारख्या नेक्स्ट जनरेशन बायोफ्युल्समध्ये रुपांतरीत करते.

कियारी इनोव्हेशन्स भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी काम करत आहे. त्यांनी एनीडर्स - अ‍ॅनिमल इंट्र्यूशन डिटेक्शन अँड रेपेलेंट सिस्टम नावाचे नाविन्यपूर्ण उत्पादन तयार केले आहे. हे उपकरण मेकॅनाईज्ड स्केअरक्रो सारखे कार्य करते जे प्राण्यांच्या घुसखोरीपासून शेतजमिनींचे संरक्षण करू शकते.

अ‍ॅगस्मार्टिक टेक्नॉलॉजीजकडे एआय, आयओटी आणि संगणक दृष्टिकोनाचा वापर करून डेटा प्रणित दृष्टिकोनाच्या माध्यमातून अचूक सिंचन व रोग व्यवस्थापनाद्वारे पीक उत्पन्न वाढवण्याची दूरदृष्टी आहे. त्यांचे उत्पादन क्रॉप्लिटिक्स ® हे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सोल्यूशनचे संयोजन आहे जे सिंचनसाठी एक अचूक मॉडेल तयार करण्यासाठी कृतीक्षम  माहितीमध्ये डेटाचे रूपांतर करण्यासाठी ग्राउंड सेन्सर डेटा आणि उपग्रह प्रतिमेचे एकत्रीकरण करते.

वर उल्लेखलेल्या  स्टार्टअप्स व्यतिरिक्त शेतीची परिसंस्था सुधारण्यासाठी आणि शेतीतील घरगुती उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक नवीन उपाय आहेत.

एकूणचया टप्प्यात कृषी आणि संलग्न क्षेत्रातील एकूण 346 स्टार्टअप्ससाठी 3671.75 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या स्टार्ट अप्सना भारतभर पसरलेल्या 29 कृषी व्यवसाय इन्क्युबेशन  केंद्रांवर (केपी आणि आरएबीआय) दोन महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात आले.  या स्टार्ट अप्समुळे तरुणांना रोजगार मिळेल. याशिवाय ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे उत्पन्न वाढवण्यात हातभार लावतील.

कृषि-उद्योजकता बाबत  अधिक माहितीसाठी, आरकेव्हीवाय वेबसाइट: https://rkvy.nic.in  ला भेट द्या

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1643882) Visitor Counter : 114