संरक्षण मंत्रालय
स्मार्ट इंडिया हॅकेथाँन -2020मधे डिफेन्स इंन्सिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीला मिळाला प्रथम पुरस्कार
Posted On:
06 AUG 2020 3:07PM by PIB Mumbai
स्मार्ट इंडिया हॅकेथाँन (SIH)2020 हॅकेथॉन स्पर्धेत, ज्यात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सहभागी विद्यार्थ्यांबरोबर प्रत्यक्ष संवाद साधला होता, संरक्षण संशोधन आणि विकास विभाग डीआरओडी(DROD) या अंतर्गत येणाऱ्या, डिफेन्स इंन्सिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजी (DIAT) पुणे या स्वायत्त संस्थेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय (HRD)आणि अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (AICTE) यांनी आयोजित केलेली 36 तास अविरतपणे चाललेली एसआयएच -2020 साठी साँफ्टवेअर साठी डिजिटल प्राँडक्ट बिल्डींग स्पर्धा उत्तर प्रदेशातील नाँयडा इंन्सिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉंलॉजी (NIET ) येथे दिनांक 1-3आँगस्ट 2020 रोजी झाली.
डिफेन्स इंन्सिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजीचा मार्गदर्शक डॉ. सुनिता ढवळे यांचा एज ऑफ अल्ट्राँन नावाचा सहा विद्यार्थ्यांचा संघाला मध्यप्रदेश सरकारने घातलेल्या साँफ्टवेअर, मधल्या प्राँब्लेम स्टेटमेंट MS331 यासाठी 1लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले. या संघाने दृष्टी (DRISHTI)असे क्रुत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञान वापरून चेहरा, भाव व्यक्त करणे आणि हावभाव यावर उत्तर शोधले.
संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि अध्यक्ष डॉ.जी.सतीश रेड्डी यांनी डाअटच्या संघाचे सतत दुसऱ्या वर्षी देखील या स्पर्धेत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643848)
Visitor Counter : 177