भूविज्ञान मंत्रालय

मुंबईत सध्या सुरु असलेल्या जोरदार वारे आणि मुसळधार पावसासंबंधी विशेष संदेश

Posted On: 05 AUG 2020 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2020


राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्र/प्रादेशिक हवामान विभाग, नवी दिल्ली येथील भारतीय हवामान खात्यानुसार:

मुंबईमध्ये 5 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 0830 ते संध्याकाळी 1730 पर्यंत झालेले पर्जन्यमान: मुसळधार पाऊस ( ≥ 20cm) आतापर्यंत मुंबईच्या काही भागांमध्ये झाला: कुलाबा: 22.9 सेंमी, सांताक्रूझ: 8.8 सेंमी.

मुंबईतील वाऱ्याचा जोर: कुलाब्यात 60-70 किमी प्रती तास या वेगाने वारे वाहत होते. कुलाब्यात 1700-1715 या वेळेत वाऱ्याचा वेग 107 किमी प्रती तास एवढा झाला होता.

मुंबई आणि नजीकच्या क्षेत्रासाठी हवामान अंदाज आणि इशारा-

मुंबई आणि लगतच्या कोकण किनारपट्टीवर 6 तारखेच्या सकाळपर्यंत 70 किमी प्रती तास या जोरदार वेगाने वारे वाहतील आणि त्यानंतर वाऱ्याचा जोर कमी होईल.

मुंबईत आज रात्री मुसळधार पाऊस सुरु राहणार असून 6 ऑगस्टच्या सकाळपासून पावसाचा जोर ओसरेल.

 

ढगांचे रडार आणि उपग्रहाच्या माध्यमातून घेतलेले छायाचित्र:

 ppi_mum.gif


 
* * *

G.Chippalkatti/S.Thakur/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643618) Visitor Counter : 123