संरक्षण मंत्रालय
74व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सैन्यदल, नौदल आणि भारतीय वायुसेनेच्या बँड पथकाचे सादरीकरण
Posted On:
05 AUG 2020 1:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2020
स्वातंत्र्य दिनानिमित्त सैन्य दलाकडून प्रथमच देशभरात एक ऑगस्ट पासून आपल्या बँड पथकाद्वारे सादरीकरण करण्यात येत आहे. आपला जीव धोक्यात घालून देशात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लढत असणार्या कोरोना योद्ध्यांविषयी देशाची कृतज्ञ भावना व्यक्त करणं हे या सादरीकरणाचे उद्दीष्ट आहे. पोरबंदर, हैदराबाद, बेंगळुरू, रायपूर, अमृतसर, गुवाहाटी, अलाहाबाद आणि कोलकाता येथे सैन्यदल, नौदल आणि पोलिसांच्या बँड पथकाने सादरीकरण केले आहे. विशाखापट्टणम, नागपूर आणि ग्वाल्हेर येथे लष्करी दल आणि पोलिस यांचे बँड पथक आज दुपारी सादरीकरण करणार आहे. 7 ऑगस्ट रोजी लष्कराचे बँड पथक श्रीनगर आणि कोलकाता येथे सादरीकरण करणार आहेत.
दिल्लीतील लाल किल्ला, राजपथ आणि इंडिया गेट येथे अनुक्रमे 8, 9 आणि 12 ऑगस्ट रोजी तिन्ही दलांचे सादरीकरण होणार आहे. सैन्य दल आणि पोलिस बँड 8 ऑगस्ट 2020 रोजी मुंबई, अहमदाबाद, सिमला आणि अल्मोडा येथे, 9 ऑगस्ट 2020 रोजी चेन्नई, नसीराबाद, एएनसी (अंदमान आणि निकोबार कमांड) फ्लॅग पॉईंट आणि दांडी येथे, इंफाळ, भोपाळ आणि झांसी येथे 12 ऑगस्ट रोजी सादरीकरण करतील. अंतिम सादरीकरण 13 ऑगस्ट 2020 रोजी लखनऊ, फैजाबाद, शिलॉंग, मदुराई आणि चंपारण येथे होईल.
* * *
U.Ujgare/S.Tupe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1643493)
Visitor Counter : 158