आदिवासी विकास मंत्रालय
आदिवासी विकास मंत्रालयाच्या सहयोगातून ट्रायफेडचा डिझाईन उपक्रमात पुढाकार
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2020 8:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2020
वेगवान बदलत्या जगात, जिथे आधुनिकता, तंत्रज्ञान आणि विकासाची मुळे घट्ट रुजली असली आणि जगण्याचे आदिम स्वदेशी मार्ग असले तरी आता या पुस्तकांत आढळणाऱ्या, भूतकाळातील गोष्टी आहेत, अजूनही भारतात 200 हून अधिक आदिवासी समुदाय देशभर पसरलेले आहेत. आदिवासी कारागीर, आजही त्यांच्या समाजातील कला, हस्तकला आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. आदिवासी विकास मंत्रालयाचा ट्रायफेड अर्थात भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ या वंचित लोकांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने या समुदायांच्या आर्थिक कल्याणासाठी प्रोत्साहन देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात नेण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच्या विविध उपक्रमांमध्ये, अंमलबजावणी आणि कार्यक्रमांपैकी विशेष उल्लेखनीय उपक्रम म्हणजे भारतातील आदिवासींसाठी डिझाईन उपक्रम.
निवडक आदिवासी कारागिरांना जास्त वाव मिळावा तसेच त्यांच्या कौशल्यांना आणि उत्पादनांना आंतरराष्ट्रीय मानक दर्जा प्राप्त होण्यासाठी ट्रायफेडने गेल्या काही महिन्यांपासून प्रचारासाठी आणि डिझाइन विकासासाठी रितु बेरी, रीना ढाका, रूमा देवी, विंकी सिंग, नीरा नाथ आणि रोझी अहलुवालिया यासारख्या नामांकित डिझाइनर्सबरोबर भागीदारी केली आहे.
आदिवासी उत्पादने व हस्तकलांना व्यापक प्रमाणात प्रसिद्धी मिळावी आणि मोठ्या संख्येने चाहते लाभावेत यासाठी या क्षेत्रातील अनुभवी असलेल्या रीना ढाका ट्रायफेडची मुख्य डिझाइन सल्लागार म्हणून काम करतील. सन 2020 च्या फेब्रुवारी महिन्यात वार्षिक सूरजकुंड मेळा येथे झालेल्या फॅशन आठवड्यात त्यांनी त्यांच्या संग्रहातील बहुमूल्य ठेवा सादर केला, ज्यात मूळ आदिवासींच्या पारंपरिक रचना होत्या. प्रतिभावान कारागीरांना विपुल प्रेक्षक मिळावेत यासाठी त्या आदिवासी उत्पादने व उत्पादनांसाठी आकर्षक भेटवस्तू वेष्टनाच्या श्रेणी विकसित करीत आहेत. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील आदिवासी कारागिरांसह त्या बाघ प्रिंटमध्ये नवीन डिझाईन्स विकसित करीत आहेत. राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा हेतू यामागे आहे कारण ही सुंदर वेष्टनाकृती गुणवत्तेची उत्पादने केवळ ट्राइब इंडिया आउटलेटमध्येच नव्हे तर ई-कॉमर्स संकेतस्थळावरही विकली जातात.
याव्यतिरिक्त, आदिवासी कारागिरांना वाव मिळावा म्हणून रीना ढाका त्यांच्या 'दि डिझायनर अँड द म्यूज' या प्रसिद्ध शोमधील नामांकित व्यक्तींच्या मुलाखतींच्या माध्यमातून आदिवासी हस्तकलेची व उत्पादनांची जाहिरात करीत आहेत. यात गौहर खान, डलनाझ इराणी, पूजा बत्रा आणि रक्षदा खान सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमात ट्रायफेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीर कृष्णा यांचीदेखील मुलाखत या कार्यक्रमात झाली होती तेव्हा त्यांनी आदिवासींना सक्षम बनविण्यात ट्रायफेडच्या भूमिकेबद्दल माहिती दिली होती.
नवी दिल्लीमधील महादेव रोड वरील ट्राइब इंडियाच्या महत्वाकांक्षी दुकानाचे (ज्याची 1997 मध्ये स्थापना केली गेली होती) नूतनीकरण केले जात असताना नीरा नाथ या सुप्रसिद्ध डिझाइनरने त्यांच्या सौंदर्यदृष्टीने रचना केली होती. या डिझाइनर्सच्या सहकार्याने विकसित केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी स्वतंत्र गॅलरी देखील तयार केली गेली आहे. परिणामी सुधारित दुकान आणि गॅलरी अधिक मोहक आणि लक्षवेधी पद्धतीने या उत्कृष्ट वस्तू प्रदर्शित करण्यात मदत करतात. दिल्ली हाट दुकानाच्या सुशोभिकरणात नीरा नाथ यांच्या तज्ञाने हातभार लावला.
ट्रायफेडने सुरू केलेल्या कौशल्य-उन्नती कार्यक्रमात हे सल्लागार डिझाइनर्स आणि निवडक कुशल आदिवासी कारागीर सहयोगातून काम करतात. प्रत्येक समूहात प्रत्येकी किमान 20 आदिवासी कारागीर असतात. या कारागीरांच्या समूहाला कुशल कारागीरांकडून प्रशिक्षण घेऊन त्यांची कौशल्ये वाढवण्यास प्रोत्साहित केले जाते आणि हस्तकला आणि उत्पादनांची आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेली रचना आत्मसात केली जाते. ट्राइब इंडिया वर प्रातिनिधिक स्तरावर 15-20 डिझाईन्स प्रदर्शित केल्या जातात.
या उपक्रमांव्यतिरिक्त, यावर्षी ऑस्कर पुरस्कारासाठी रोझी अहलुवालिया यांनी तयार केलेल्या 'दिखा खादी' नावाच्या संग्रहातील आदिवासींच्या सहकार्याने तयार केलेले गाउन विशेष आकर्षण होते. प्रतिभावंत आदिवासींच्या कलागुणांना संधी देणारा तो क्षण खरोखरच अभिमानास्पद होता.



B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1643372)
आगंतुक पटल : 234