आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्कने (eVIN) कोविड संक्रमण काळात अत्यावश्यक लसीकरण सेवेची उपलब्धता सुनिश्चित केली

Posted On: 03 AUG 2020 6:33PM by PIB Mumbai

 

देशभरातील लसीकरणाचा साखळी पुरवठा मजबूत करण्याचे कार्य इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्ककडून (eVIN) अभिनव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत याची अंमलबजावणी केली जाते. ईवीनचा उद्देश लसींचा साठा आणि प्रवाह, देशभरातील सर्व शीत साखळीतील साठवणूक तापमानावर तात्काळ (रिअल-टाईम) माहिती पुरवली जाते. कोविड संक्रमण काळात आवश्यक लसीकरण सेवा सुरू ठेवण्यासाठी आणि बालकांना आणि गर्भवती मातांना लस प्रतिबंधक रोगापासून बचावासाठी आवश्यक असलेल्या सानुकूलनेसह या मजबूत प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

ईवीनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे, मजबूत माहिती तंत्रज्ञान संरचना आणि प्रशिक्षित मनुष्यबळ यांच्या माध्यमातून देशभरातील विविध ठिकाणी असलेल्या साठा आणि साठवणूक तापमानाचे रिअल टाईम निरीक्षण केले जाते.

ईवीन सध्या 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहचले आहे, लवकरच याची सुरुवात अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगड, लडाख आणि सिक्कीम या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये होणार आहे. सध्या 22 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांच्या 585 जिल्ह्यातील 23,507 शीत साखळी बिंदू ईवीनच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रभावी लस रसद व्यवस्थापन करतात. 41,420 पेक्षा अधिक शीत साखळी हाताळणाऱ्यांना ईवीनने डिजीटल नोंदणीचे प्रशिक्षण दिले आहे. सुमारे 23,900 इलेक्ट्रॉनिक टेम्परेचर लॉगर्स लस शीत साखळी उपकरणांमध्ये लस साठ्यांच्या आढाव्यासाठी अचूक तापमानाची नोंद ठेवण्यासाठी बसवण्यात आले आहेत.

इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलीजन्स नेटवर्कच्या मदतीने बिग डेटा आर्किटेक्चरच्या आधारे कृतीशील विश्लेषणांच्या माध्यमातून निर्णय आणि खर्चात बचत करण्यासाठी लसींच्या साठ्याविषयी नियोजन करणे शक्य झाले आहे. बहुतांश आरोग्य केंद्रांमध्ये लसीची उपलब्धता 99% अशा सर्वोच्च पातळीपर्यंत पोहचली आहे. सध्या ईवीनचा वापर असलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये 99% सक्रीयता दर दर्शवतो की, तंत्रज्ञानाचा उच्च अवलंब झाला आहे. तर, साठा संपण्याचे प्रमाण 80% नी कमी झाले आहे, तसेच साठा पुन्हा भरुन काढण्यासाठी लागणारा वेळ अर्ध्यावर आला आहे. यामुळे लसीकरण सत्रासाठी पोहोचणार्‍या प्रत्येक बालकाचे लसीकरण करण्यात आले आहे आणि लस उपलब्ध नसल्यामुळे परत जाण्याची वेळ येऊ नये याची खात्री केली आहे.

कोविड-19 विरोधातील केंद्र सरकारच्या लढाईत मदत म्हणून ईवीन इंडिया राज्य/केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिसाद साहित्याच्या साखळी पुरवठ्यावर लक्ष ठेवत आहे. एप्रिल l 2020 पासून, आठ राज्य (त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि महाराष्ट्र) ईवीन अॅप्लीकेशनचा वापर करुन 100% पालन दराने राज्याशी संबंधित कोविड-19 घटक पुरवठ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि 81 आवश्यक औषधे आणि उपकरणांच्या तुटवड्यासंदर्भात संदेश देण्याचे काम करत आहे.

कोविड-19 वर लस जेंव्हा केंव्हा उपलब्ध होईल, तेंव्हा या सशक्त व्यासपीठाचा लाभ घेता येईल एवढी यात क्षमता आहे.

 

M.Chopade/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1643198) Visitor Counter : 721