शिक्षण मंत्रालय

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या ग्रँड फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020 मध्ये 21 व्याशतकातल्या युवकांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब-पंतप्रधान

परिवर्तनात्मक सुधारणा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट, रोजगार मिळवणारे निर्माण करण्याऐवजी रोजगार निर्माण करणारे घडवण्यावर भर- पंतप्रधान

Posted On: 01 AUG 2020 10:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 च्या ग्रँड फिनालेला व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे संबोधित केले.

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन

देशासमोरच्या आव्हानांवर अनेक तोडगे काढण्यासाठी विद्यार्थी काम करत असल्याचे पंतप्रधानांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या ग्रँड फिनालेला संबोधित करताना सांगितले. समस्यांवर उपाय पुरवण्याबरोबरच डाटा, डीजीटायझेशन आणि हाय टेक भविष्य याबाबत भारताच्या आकांक्षाही ते मजबूत करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 21 व्या शतकाची जलद गती जाणून घेत प्रभावी भूमिका बजावणे सुरूच ठेवण्यासाठी भारताने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नवोन्मेश, संशोधन, विकास आणि उद्योजकता यासाठी आवश्यक परीरचना देशात उभारण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भारताचे शिक्षण अधिक आधुनिक करणे आणि नैपुण्याला अधिक संधी निर्माण करणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण

21 व्या शतकातल्या युवकांचे विचार, आशा आणि आकांक्षा लक्षात घेऊन राष्ट्रीय शैक्षणिकधोरण आखण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. हा केवळ धोरण दस्तावेज नाही तर 130 कोटी पेक्षा जास्त भारतीयांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब यात आहे. अगदी आजही अनेक मुलांची अशी भावना आहे की आपल्याला ज्या विषयात रुची नाही अशा विषयावर आधारित आपले मूल्यमापन केले जाते. पालक, नातेवाईक, मित्र इत्यादींच्या दबावामुळे, इतरांनी निवडलेल्या विषयांचा मुलांना स्वीकार करणे भाग पडते. यामुळे जनतेतला मोठा  वर्ग, जो उत्तम शिक्षित आहे मात्र त्यांनी जे वाचन केले आहे त्यातले बरेचसे त्यांच्या उपयोगाचे नाही. नवे शैक्षणिक धोरण या दृष्टीकोनात बदल घडवणारे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.भारतीय शिक्षण प्रणालीत सुसूत्र सुधारणा आणि शिक्षणाचा  हेतू आणि आशय अशा दोन्हीतही परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करत हे साध्य करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ अनुभव फलदायी, विस्तारित आणि  नैसर्गिक आवडीला पूरक ठरावा यासाठी नवे धोरण शिक्षण , संशोधन आणि नवोन्मेश यांच्यावर लक्ष केंद्रित करणारेआहे.  

हे हॅकेथॉन म्हणजे तुम्ही समस्या सोडवण्याचा केलेला पहिला प्रयत्न नव्हे आणि शेवटचाही नव्हे. युवकांनी शिकणे,प्रश्न विचारणे आणि ते सोडवणे या तीन बाबी सुरूच ठेवल्या पाहिजेत असे ते म्हणाले. एखादी व्यक्ती शिकते तेव्हा प्रश्न विचारण्याची बुद्धी त्याच्याकडे येते, याचेच प्रतिबिंब भारताच्या राष्ट्रीयशैक्षणिक धोरणात असल्याचे त्यांनी सांगितले. जे शाळेनंतर रहात नाही,अशा   दप्तराच्या ओझ्या, वरचे लक्ष आता  शिक्षणाच्या वरदानाकडे वळवण्यात येत आहे,असे पंतप्रधान म्हणाले.    

आंतरशाखीय विषयांच्या अभ्यासावर भर

नवीन शैक्षणिक धोरणाच्या महत्वपूर्ण वैशिष्ट्यांपैकी एक विशेष म्हणजे आता विद्यार्थी वर्गाला आंतरशाखीय विषयांचा अभ्सास करता येणार आहे. कारण कोणत्याही एका मापामध्ये सर्वांनाच बसवता येत नाही, याचा विचार करून धोरण निश्चित करताना मुलांना आपल्याला नेमका कोणत्या विषयात विशेष गोडी वाटते, याचा विचार करता येणार आहे आणि आपल्या आवडीच्या विषयात अधिक शिक्षण घेता येणार आहे. समाजाला किंवा इतरांना काय वाटते, ते त्याने शिकू नये, त्याऐवजी त्या विद्यार्थ्‍याला कोणत्या शाखेचे शिक्षण घ्यायचे आहे, ते घेता येणार आहे.

शिक्षणामध्ये प्रवेश, शिक्षणाची उपलब्धता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या   शिक्षण सर्वांना उपलब्ध असले पाहिजे, या वचनाचे उद्धरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, प्रस्तुत शैक्षणिक धोरण हे डॉ. आंबेडकर यांच्या शिक्षण प्रवेशासंबंधीच्या, शिक्षण उपलब्धतेच्या संकल्पनेला समर्पित आहे. प्राथमिक शिक्षणापासून प्रारंभ होत असलेले शिक्षण, प्रवेशासाठी सर्वांना उपलब्ध असणार आहे. या धोरणाचे ध्येय सन 2035 पर्यंत देशात उच्च शिक्षणासाठी एकूण पटनोंदणीच्या प्रमाणामध्ये 50 टक्के वाढ व्हावी, असे निश्चित करण्यात आले आहे. या शैक्षणिक धोरणाचा हेतूच मुळात विद्यार्थी वर्गाने नोकरी शोधण्याऐवजी रोजगार निर्मिती करण्यावर भर देवून नोकरी देणारे बनावे, असा आहे. याचाच अर्थ एक प्रकारे आपल्या मानसिकतेमध्ये आणि आपल्या दृष्टिकोनामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.

स्थानिक भाषेवर भर

पंतप्रधान म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारतीय भाषांची प्रगती होण्यास आणि पुढे विकसित होण्यास मदत होईल. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या काळात स्वतःच्या भाषेत शिकल्याचा लाभ होईल. नवीन शैक्षणिक धोरणामुळे संपन्न भारतीय भाषांची जगाला ओळख होईल, असे ते पुढे म्हणाले.

जागतिक एकात्मतेवर भर

पंतप्रधान म्हणाले, धोरणात स्थानिकवर लक्ष केंद्रीत केले आहे, त्याचवेळी जागतिक एकात्मेवरही भर देण्यात आला आहे. शीर्ष जागतिक संस्थांना भारतात आपल्या शाखा सुरु करण्यास प्रवृत्त करण्यात येईल. यामुळे भारतीय युवकांना जागतिक दर्जाचे प्रदर्शन करता येईल आणि विविध संधी उपलब्ध होतील, तसेच त्यांना जागतिक स्पर्धेशी मुकाबला करण्याची तयारी करता येईल. यामुळे भारतात जागतिक स्तरावरील संस्था निर्माण करण्यास आणि भारताला जागतिक शिक्षणाचे केंद्र बनविण्यास मदत होईल.

तत्पूर्वी आज सकाळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी  नवी दिल्लीत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (सॉफ्टवेअर) 2020 च्या चौथ्या आवृत्तीच्या अंतिम फेरीचे आभासी उद्घाटन केले. मनुष्यबळ  विकास राज्यमंत्री संजय धोत्रे; उच्च शिक्षण सचिव अमित खरे; एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे; मुख्य संशोधन अधिकारी डॉ अभय जेरे यावेळी उपस्थित होते.  केंद्र  सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), पर्सिस्टंट सिस्टीम्स आणि i4c यांनी हॅकेथॉनचे आयोजन केले.

उद्‌घाटन समारंभात मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ म्हणाले की यावर्षीच्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत 4.5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ते म्हणाले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील डिजिटल दरी सांधण्यासाठी आणि डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी डिजिटल इंडियाची कल्पना मांडली जेणेकरुन विकासाला एक व्यापक लोकचळवळ बनवता येईल आणि भारतातील प्रत्येकाच्या आवाक्यात शासन कारभार येईल. महामारीत  डिजिटल इंडिया उपक्रमांचे लाभ आपण सर्व  पाहात आहोत.

पोखरियाल यांनी अधोरेखित केले कि हॅकेथॉन हे जगातील सर्वात मोठे खुले संशोधन मॉडेल आहे ज्यात 4.5  लाखाहून अधिक विद्यार्थी, 2000 हून अधिक  शैक्षणिक संस्था, 1000 पेक्षा अधिक मार्गदर्शक , 1500 हून अधिक मूल्यांकन करणारे , 70 हून अधिक समस्या सादर करणार्‍या एजन्सी आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारी विभाग आणि खाजगी उद्योग यांचा समावेश असल्यामुळे ते  खरे पीपीपी मॉडेल आहे. या प्रकारचे मॉडेल जगात कुठेही अस्तित्वात नाही जिथे एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले असतील.

पोखरियाल यांनी आत्मनिर्भर भारत साठी नाविन्यपूर्ण संस्कृतीवर भर दिला. ते म्हणाले, स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या सहभागींनी तयार केलेले उपाय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या वोकल फॉर लोकल चा उद्देश मजबूत करेल. त्यांनी माहिती दिली की यावर्षी आपल्याकडे  37 केंद्र सरकारचे विभाग ,13  राज्य सरकार आणि 20 उद्योगांमधील  243 समस्या सोडविण्यासाठी 10,000 हून अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी 1,00,000 रुपयांचे पारितोषिक असेल. तर  विद्यार्थी इनोव्हेशन थीम साठी प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते असतील आणि त्यांची पारितोषिक रक्कम अनुक्रमे 1,00, 000,  75,000 आणि 50,000 रुपये असेल.

या प्रसंगी बोलताना धोत्रे म्हणाले की, नाविन्यपूर्ण उत्पादनाची  संस्कृती आणि समस्येचे निराकरण करण्याची मानसिकता बिंबवण्यासाठी , युवा लोकसंख्या,ऊर्जा आणि तरूणांच्या कल्पनांचा उपयोग करण्यासाठी, संस्था स्तरावर वर्षभर असे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यांनी असेही सुचवले की संस्थांकडे समस्यांची सूची असावी  जेणेकरुन विद्यार्थी आपल्या आवडीनुसार समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकेल. अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर वाव मिळतो. अटल टिंकरिंग लॅबमध्ये विकसित केलेल्या कल्पना किंवा मॉडेल स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये पुढे नेता येतील. आणखी एका  प्रमुख औषध शोध हॅकेथॉनचा विचार सुरु आहे  ज्यामुळे अशा प्रकारच्या साथीच्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी नवीन औषधे शोधता येतील.

उच्च शिक्षण सचिव अमित खरे म्हणाले की स्मार्ट इंडिया हॅकैथॉन २०२० ची सॉफ्टवेअर आवृत्ती ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. शिक्षणाच्या  ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा  अवलंब करून शिक्षणपद्धतीत परिवर्तन घडवले जात आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या मोठ्या यशानंतर, दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय हॅकेथॉन म्हणजेच भारत- पोर्तुगाल हॅकेथॉन आणि भारत- आसियान हॅकेथॉन होणार आहेत, लोकलकडून  ग्लोबलकडे जाण्याचे हे खरे संकेत  आहेत.

तत्पूर्वी आज सकाळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी  नवी दिल्लीत स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (सॉफ्टवेअर) 2020 च्या चौथ्या आवृत्तीच्या अंतिम फेरीचे आभासी उद्घाटन केले. मनुष्यबळ  विकास राज्यमंत्री संजय धोत्रे; उच्च शिक्षण सचिव अमित खरे; एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे; मुख्य संशोधन अधिकारी डॉ अभय जेरे यावेळी उपस्थित होते.  केंद्र  सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), पर्सिस्टंट सिस्टीम्स आणि i4c यांनी हॅकेथॉनचे आयोजन केले.

उद्‌घाटन समारंभात मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ म्हणाले की यावर्षीच्या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत 4.5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ते म्हणाले की, पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील डिजिटल दरी सांधण्यासाठी आणि डिजिटल साक्षरतेला चालना देण्यासाठी डिजिटल इंडियाची कल्पना मांडली जेणेकरुन विकासाला एक व्यापक लोकचळवळ बनवता येईल आणि भारतातील प्रत्येकाच्या आवाक्यात शासन कारभार येईल. महामारीत  डिजिटल इंडिया उपक्रमांचे लाभ आपण सर्व  पाहात आहोत.

पोखरियाल यांनी अधोरेखित केले कि हॅकेथॉन हे जगातील सर्वात मोठे खुले संशोधन मॉडेल आहे ज्यात 4.5  लाखाहून अधिक विद्यार्थी, 2000 हून अधिक  शैक्षणिक संस्था, 1000 पेक्षा अधिक मार्गदर्शक , 1500 हून अधिक मूल्यांकन करणारे , 70 हून अधिक समस्या सादर करणार्‍या एजन्सी आहेत . यामध्ये केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारी विभाग आणि खाजगी उद्योग यांचा समावेश असल्यामुळे ते  खरे पीपीपी मॉडेल आहे. या प्रकारचे मॉडेल जगात कुठेही अस्तित्वात नाही जिथे एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले असतील.

पोखरियाल यांनी आत्मनिर्भर भारत साठी नाविन्यपूर्ण संस्कृतीवर भर दिला. ते म्हणाले, स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या सहभागींनी तयार केलेले उपाय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या वोकल फॉर लोकल चा उद्देश मजबूत करेल. त्यांनी माहिती दिली की यावर्षी आपल्याकडे  37 केंद्र सरकारचे विभाग ,13  राज्य सरकार आणि 20 उद्योगांमधील  243 समस्या सोडविण्यासाठी 10,000 हून अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक समस्येच्या निराकरणासाठी 1,00,000 रुपयांचे पारितोषिक असेल. तर  विद्यार्थी इनोव्हेशन थीम साठी प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन विजेते असतील आणि त्यांची पारितोषिक रक्कम अनुक्रमे 1,00, 000,  75,000 आणि 50,000 रुपये असेल.

या प्रसंगी बोलताना धोत्रे म्हणाले की, नाविन्यपूर्ण उत्पादनाची  संस्कृती आणि समस्येचे निराकरण करण्याची मानसिकता बिंबवण्यासाठी, युवा लोकसंख्या, ऊर्जा आणि तरूणांच्या कल्पनांचा उपयोग करण्यासाठी, संस्था स्तरावर वर्षभर असे उपक्रम राबवणे आवश्यक आहे. त्यांनी असेही सुचवले की संस्थांकडे समस्यांची सूची असावी  जेणेकरुन विद्यार्थी आपल्या आवडीनुसार समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकेल. अटल टिंकरिंग लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर वाव मिळतो. अटल टिंकरिंग लॅबमध्ये विकसित केलेल्या कल्पना किंवा मॉडेल स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये पुढे नेता येतील. आणखी एका  प्रमुख औषध शोध हॅकेथॉनचा विचार सुरु आहे  ज्यामुळे अशा प्रकारच्या साथीच्या रोगांविरुद्ध लढण्यासाठी नवीन औषधे शोधता येतील.

उच्च शिक्षण सचिव अमित खरे म्हणाले की स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2020 ची सॉफ्टवेअर आवृत्ती ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. शिक्षणाच्या  ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा  अवलंब करून शिक्षणपद्धतीत परिवर्तन घडवले जात आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या मोठ्या यशानंतर, दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय हॅकेथॉन म्हणजेच भारत- पोर्तुगाल हॅकेथॉन आणि भारत- आसियान हॅकेथॉन होणार आहेत, लोकलकडून  ग्लोबलकडे जाण्याचे हे खरे संकेत  आहेत.

U.U/S.K/S.T/PM

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642957) Visitor Counter : 225