उपराष्ट्रपती कार्यालय

राज्यसभा खासदार अमर सिंग यांच्या आकस्मिक निधानाबद्दल उपराष्ट्रपतींनी शोक व्यक्त केला

Posted On: 01 AUG 2020 7:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2020

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष, एम वेंकैय्या नायडू यांनी राज्यसभेचे अपक्ष सदस्य अमर सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 64 वर्षीय अमर सिंग यांचा आज सिंगापूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. 

उपराष्ट्रपती सिंगापूर येथील भारतीय उच्चायुक्तालयाच्या नियमित संपर्कात होते आणि सिंग यांच्या उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या.

उपराष्ट्रपती नायडू अमर सिंग यांच्याही नियमित संपर्कात होते आणि त्यांच्या आरोग्याची विचारपूस करत होते. अमर सिंग लवकरच बरे होऊन भारतात परत येतील अशी त्यांना आशा होती.

अमर सिंग यांचे तुलनेने कमी वयात निधन झाल्याबद्दल दुःख व्यक्त करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, देशाने एक सक्षम संसद सदस्य गमावला आहे.

अमर सिंग राजकीय क्षेत्रात लोकप्रिय होते आणि समाजातील दुर्बल आणि वंचित वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले, उपराष्ट्रपती म्हणाले.

 

G.Chippalkatti/S.Thakur/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642919) Visitor Counter : 140