संरक्षण मंत्रालय

एअर मार्शल बी. सुरेश PVSM AVSM VM ADC


एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, डब्लू ए सी, आय ए एफ सेवानिवृत्त

Posted On: 31 JUL 2020 8:52PM by PIB Mumbai

 

भारतीय हवाई दलाच्या पश्चिम मुख्यालयाचे प्रमुख (कमांडिंग-इन-चीफ) एअर मार्शल बी. सुरेश PVSM AVSM VM ADC, आपल्या 40 वर्षांच्या उल्लेखनीय कारकीर्दीनंतर 31 जुलै 2020 रोजी सेवानिवृत्त झाले.

1980 साली एअर मार्शल भारतीय वायू दलामध्ये फायटर पायलट पदावर रुजू झाले होते. राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, देहरादून आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासलाचे माजी विद्यार्थी एअर मार्शल यांना टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट कडून 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' ने देखील सन्मानित केले आहे.

एअर मार्शल सुरेश हे एक अत्यंत अनुभवी फायटर पायलट आहेत आणि त्यांनी विविध प्रकारची विमाने उडविली आहेत.आपल्या विशिष्ट कारकीर्दीत एअर मार्शल यांनी अनेक प्रतिष्ठित कमांड आणि स्टाफच्या नियुक्त्या केल्या.त्यांनी कारगिल संघर्षात पश्चिम सीमेवर तैनात एका फाइटर स्क्वॉड्रनचे नेतृत्व केले जी सागरी आणि रात्रीच्या हवाई हल्ल्यांमध्ये निष्णात होती आणि कारगील युद्धात पश्चीमी सीमेवर तैनात होती. त्रि-सेवा समन्वयासाठी जबाबदार असणाऱ्या डायरेक्टर ऑपरेशन्स (जॉईंट प्लानिंग) पदाचा कार्यभार घेण्यापूर्वी ते टॅक्टिक्स अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटचे मुख्य होते. आयएएफची आंतरराष्ट्रीय स्तरावर शक्तिशाली सैन्य म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी  घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम) हा राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. ते ग्रुप कॅप्टन म्हणून राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सर्वात तरुण प्राप्तकर्त्यांपैकी एक होते.

एअर मार्शल सुरेश हे पश्चिमी वायू दलाचे प्रमुख हवाई अधिकारी (एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) म्हणून नियुक्त होण्यापूर्वी दक्षिणी वायू दलाचे प्रमुख हवाई अधिकारी (एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) होते. त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणी वायू दलाच्या कार्यक्षमतेत वेगाने वाढ झाली. २०१८ मधील केरळ पूर परिस्थिती दरम्यान संपूर्ण 'मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण' (एचएडीआर) कार्य दक्षिणी वायू दलामार्फत करण्यात आले.

.........

G.Chippalkatti/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642716) Visitor Counter : 173