अर्थ मंत्रालय
केंद्र सरकारचा 2020-21 आर्थिक वर्षातील जून 2020 पर्यंतचा लेखा आढावा
Posted On:
31 JUL 2020 5:41PM by PIB Mumbai
केंद्र सरकारने जून 2020 पर्यंतचा मासिक लेखा आढावा प्रसिद्ध केला आहे. याची ठळक वैशिष्ट्ये:-
केंद्र सरकारला 2020 पर्यंत 1,53,581 कोटी रुपये प्राप्त झाले. ते 2020-21 या आर्थिक वर्षाच्या एकूण अर्थसंकल्पीय अंदाजित (बीई) जमेपैकी 6.84 टक्के आहेत. यात 1,34,822 कोटी रुपये कर महसूल (नेट टू सेंटर), रु 15,186 कोटी करेतर महसूल आणि रु.3,573 कोटी गैर कर्ज भांडवल पावत्या. गैर कर्ज भांडवल पावत्यांमध्ये कर्जाच्या पुनर्प्राप्तीचा समावेश आहे (रु. 3,573 कोटी).
रु.1,34,043 कोटी करातील वाटा म्हणून राज्यसरकारांकडे हस्तांतरीत करण्यात आले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा हा वाटा रु. 14,588 कोटी रुपयांनी कमी आहे.
केंद्र सरकारचा एकूण खर्च रु. 8,15,944 कोटी आहे (बीई 2020-21 संबंधित 26.82%), यापैकी रु. 7,27,671 कोटी महसूल खाते आणि रु. 88,273 कोटी भांडवली खात्यावर आहे. एकूण महसूल खर्चापैकी, रु.1,60,493 कोटी व्याज देयकांवर आणि रु.78,964 कोटी प्रमुख अनुदानांवर खर्च झाला आहे.
*****
G.Chippalkatti/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642602)