निती आयोग

अटल इनोव्हेशन मिशनने बिल आणि मेलिंडा गेटस् फौंडेशन- वाधवानी फौंडेशन यांच्या सहकार्याने ‘एआयएम-आयक्रेस्ट’चा केला प्रारंभ

Posted On: 30 JUL 2020 11:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2020

 

देशभरातल्या इनक्यूबेटर इकोसिस्टिममध्ये सर्वांगीण प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना सक्षम करण्यासाठी नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने (एआयएम) ‘एआयएम-आयक्रेस्ट’चा प्रारंभ केला. यासाठी बिल आणि मेलिंडा गेटस् फौंडेशन- वाधवानी फौंडेशन यांनी सहकार्य केले आहे. यामध्ये उच्च कार्यक्षमतेच स्टार्टअप्स तयार करण्यासाठी इनक्यूबेटर इकोसिस्टिमची क्षमता वाढ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारे नवसंकल्पनांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाविन्य आणण्यासाठी हा पहिल्यांदाच उपक्रम राबविण्यात येत आहे. 

एआयएमने बिल आणि मेलिंडा गेटस् फौंडेशन- वाधवानी फौंडेशन यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमामध्ये उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण कल्पना यांच्यासाठी कौशल्य आणि मदत मिळू शकणार आहे. नवउद्योजकांना  जागतिक स्तरावरचे इनक्यूबेटर नेटवर्क आणि कौशल्य प्रदान करून सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती विकसित होवू शकणार आहे. 

‘एआयएम-आयक्रेस्ट’ यांनी आपल्या नावाप्रमाणेच इनक्यूबेशन इकोसिस्टिम सक्षम करण्यासाठी आणि कार्यवृद्धीसाठी कार्यरचना केली आहे. या उपक्रमाअंतर्गत एआयएमच्या इनक्यूबेटर्सच्या उच्च प्रमाणिकरणानुसार विचार करण्यात येणार आहे. आणि हे इनक्युबेशन उद्योग अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक असणारे समर्थन प्रदान करू शकणार आहे. याचा लाभ म्हणजे नवउद्योजकांच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने दिलेले प्रशिक्षण, करण्यात येणा-या सर्व पूरक प्रक्रिया आणि उपलब्ध करून देण्यात आलेला मंच, व्यासपीठ यामुळे नवसंकल्पना प्रत्यक्षात येण्यास चालना मिळणार आहे. 

नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले, भारतीय स्टार्टअप्स इकोसिस्टिम खरोखरीच जागतिक दर्जाच्या चळवळीमध्ये विकसित झाली आहे असा आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच नीती आयोग या नवसंकल्पना साकार करण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. जागतिक बाजारपेठ काबिज करण्यासाठी भारतापुढे अनंत संधी निर्माण झाल्या आहेत. अशा काळात स्टार्टअप्सचे संगोपन करण्यासाठी सक्षम, आत्मनिर्भर संस्था बनवण्यासाठी आणि त्यांचे कार्य सुलभ करण्यासाठी बिल आणि मेलिंडा गेटस् फौंडेशन- वाधवानी फौंडेशन यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. या भागीदारीविषयी आम्ही सकारात्मक आहोत. त्यामुळे आमच्या पोटफोलिओमधल्या जागतिक दर्जाच्या नवसंकल्पना आकार घेवून त्या वाढीस लागतील तसेच त्या अधिकाधिक उंची गाठतील, असा विश्वास आहे, असेही अमिताभ कांत यावेळी म्हणाले. 


* * *

D.Wankhede/S.Bedekar/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1642469) Visitor Counter : 226