विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

डीबीटी आणि सीएसआयआर यांनी 1000 पेक्षा जास्त ‘सार्स-सीओव्ही-2 व्हायरल जीनोम’ चे अनुक्रम बनवले असल्याची डॉ. हर्षवर्धन यांची माहिती; या कार्यात देशात सर्वात मोठा प्रयत्न


सीएसआयआरच्यावतीने विकसित केलेल्या कोविड-19 तंत्रज्ञान आणि उत्पादनाचे संकलनाचे प्रकाशन

या संकलन ग्रंथामध्ये 100 पेक्षा अधिक तंत्रज्ञांचा समावेश, 93 उद्योग सूचीबद्ध भागीदार ; 60 पेक्षा जास्त उद्योगांना तंत्रज्ञानाचे हस्तांतरण

Posted On: 30 JUL 2020 11:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2020

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज  डीबीटी म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि सीएसआयआर यांनी संयुक्तपणे 1000 पेक्षा जास्त  ‘सार्स-सीओव्ही-2 व्हायरल जीनोम’चे अनुक्रम बनवले असल्याची माहिती दिली. अशा प्रकारे केलेला हा देशातला सर्वात मोठा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधन आणि कार्यामुळे कोविड-19 महामारीमुळे प्रचलित झालेला प्रचंड ताण तसेच इतर गोष्टी समजण्यासाठी मदत होणार आहे. तसेच याची कोविड आजाराचे निदान करणे, औषधोपचार करणे आणि लस तयार करणे यासाठी महत्वाची मदत होणार आहे, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. 

सीएसआयआरने विकसित केलेल्या कोविड-19 तंत्रज्ञान आणि उत्पादनांच्या संकलनाचे प्रकाशन आज करण्यात डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या संकलनामध्ये कोविड निदानापासून ते औषधोपचार तसेच व्हँटिलेटर, पीपीई संच अशा सर्व गरजांविषयीच्या 100 पेक्षा जास्त तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली आहे. तसेच 93 भागीदार उद्योगांची सूची देण्यात आली आहे. यापैकी 60 पेक्षा जास्त तंत्रज्ञानाची माहिती विविध उद्योगांना हस्तांतरित करण्यात आली आहे. 

या अतिशय कमी काळामध्ये ज्या ज्या तंत्रज्ञान आणि उत्पादनांचा पोर्टफोलिओ तयार करण्यात आला आहे, त्याला सीएसआयआरच्या वैज्ञानिकांनी सक्षमतेचा दाखला दिला आहे, असे आपल्या लक्षात आले असल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी नमूद केले. या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये अगदी कमी कालावधीत तंत्रज्ञान आणि उत्पादन विकसित करण्यासाठी सीएसआयआरचे संशोधक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, सीएसआयआरच्या संकलनामध्ये कोविड विषयक सर्व तंत्रज्ञानाची आणि उत्पादनाची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसेच कोविड-19 वर उपाय शोधणा-या संस्थांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे सोपे जाणार आहे. 

संशोधक आणि तंत्रज्ञान, उत्पादक यांच्या सुविधेसाठी सीएसआयआरने केलेल्या कामाचे डॉ. हर्षवर्धन यांनी कौतुक केले. कोविडवर उपचार ठरणारे आणि रूग्णांना परवडणारे औषध उद्योगांच्या भागीदारीमध्ये बनवण्यासाठी यासारख्या प्रयत्नांचा फायदा होणार आहे. सीएसआयआर -आयआयसीटी यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध रसायनांचा उपयोग करून फॅविपिराविरच्या ‘एपीआय’साठी एक प्रभावी कृत्रिम प्रक्रिया तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानावर आधारित औषध तयार करण्यासाठी सिप्लाकडे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात आले आहे, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितले. 

सीएसआयआर आणि एनएएल यांनी या संशोधन कार्यामध्ये दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. या संस्था हवाई उड्डाण क्षेत्रात तज्ज्ञ असल्या तरीही त्यांनी ‘स्वस्थवायू’ या व्हँटिलेटरची निर्मिती अवघ्या 36 दिवसांमध्ये केली, असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान आणि वैज्ञानिकांनी एकत्र येवून अतिशय गरजेच्या काळामध्ये उपयुक्त ठरणारे नवनवीन शोध लावून उत्पादने विकसित करण्याचे आव्हान पेलले, यामुळेच आपण या महामारीच्या संकटातून लवकरच मुक्त होवू शकणार आहे, असे सांगून डॉ. हर्षवर्धन यांनी आत्मनिर्भर भारताच्या आकांक्षाही पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. सीएसआयआरने विकसित केलेल्या ‘किसानसभा’ या वैशिष्ट्यपूर्ण पर्यायाचा त्यांनी उल्लेख केला. यामुळे शेतकरी ते पुरवठा साखळी आणि मालवाहू वाहतूक व्यवस्थापन प्रणालीसाठी एकच समाधान विकसित करण्यात आले असल्याचे सांगितले. याचे आत्तापर्यंत 60,000 पेक्षा जास्त डाउनलोड झाले आहेत. तसेच विविध प्रादेशिक भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध आहे.शेतकरी बांधवाना थेट मंडयांना जोडण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. 

सीएसआयआरचे महासंचालक डॉ. शेखर सी मांडेड यावेळी म्हणाले, टाटा सन्स, रिलायन्स उद्योग यासारख्या मोठ्या उद्योगांबरोबर भागीदारी करण्यात आली आहे. तसेच तंत्रज्ञान आणि उत्पादनासाठी लवकरच बीएचईएल आणि बीईएल यांच्याशी भागीदारी करण्यात येत आहे. सीएसआयआरने कोविड-19 पोर्टल विकसित केले असून वापरण्यासाठी ते अतिशय सुलभ आहे. 

*Please click here for details of the CSIR Compendium.


* * *

D.Wankhede/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642468) Visitor Counter : 173