भारतीय स्पर्धा आयोग

अदानी पॉवर लिमिटेड (एपीएल) द्वारे ओडिशा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (ओपीजीसी) च्या एकूण समभाग भांडवलाच्या 49% अधिग्रहण प्रस्तावाला सीसीआयने मान्यता दिली

Posted On: 30 JUL 2020 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जुलै 2020


भारतीय स्पर्धा आयोगाने अदानी पॉवर लिमिटेड (एपीएल) द्वारे ओडिशा पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (ओपीजीसी) च्या एकूण समभाग भांडवलाच्या 49% अधिग्रहण प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

प्रस्तावित व्यवहार ओपीजीसीच्या एकूण भागभांडवलाच्या 49% अधिग्रहणाशी संबंधित आहेत.

एपीएल ही एक सार्वजनिक सूचीबद्ध कंपनी असून त्याचे समभाग मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारावर सूचीबद्ध आहेत.  हा अदानी समूहाचा एक भाग आहे, जो भारतातील वीज निर्मिती, प्रसारण आणि वितरण या व्यवसायात कार्यरत आहे. एपीएल प्रामुख्याने वीज-निर्मिती व्यवसायात कार्यरत आहे.

ओदिशामध्ये कार्यरत ओपीजीसी हा ओदिशा सरकार, एईएस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एईएस ओपीजीसी होल्डिंग यांचा संयुक्त उपक्रम असून राज्य सरकारची कंपनी म्हणून कार्यरत आहे. ओपीजीसी वीज निर्मितीच्या व्यवसायात कार्यरत आहे.

सीसीआयचा सविस्तर आदेश लवकरच जारी केला जाईल.

 

* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com




(Release ID: 1642457) Visitor Counter : 123