ऊर्जा मंत्रालय
स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता यांचा विकास करण्यासाठी पीएफसी अर्थात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने आयआयटी-कानपूरबरोबर केला करार
Posted On:
29 JUL 2020 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जुलै 2020
स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता यांचा विकास करण्यासाठी पीएफसी अर्थात पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने आयआयटी-कानपूरबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या सामंजस्य करारा अंतर्गत पीएफसी सीएसआर उपक्रमांतर्गत आयआयटी-कानपूरला 2,38,97,000 रुपयांची आर्थिक मदत करेल.
स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानावर संशोधन आणि विकासासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आयआयटी-कानपूरला मदत करणे हा कराराचा उद्देश आहे, असे पीएफसीचे कार्यकारी संचालक (सीएसआर अँड एसडी) आर. मुरहरी यांनी सांगितले. प्रकल्पाचा एक भाग म्हणून आयआयटी-कानपूर 90 सहभागींना स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देईल आणि निवडक 9 उमेदवारांना ग्रिड तंत्रज्ञानावरील कल्पनांच्या विकासासाठी फेलोशिप प्रदान करेल. आयआयटी-कानपूरच्या स्टार्ट-अप इनोव्हेशन अँड इनक्युबेशन सेंटर (एसआयआयसी) कडून सहाय्य केले जाईल आणि उद्योजक उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.
G.Chippalkatti/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1642122)
Visitor Counter : 204