ऊर्जा मंत्रालय

राष्ट्रीय औष्णिक विद्युत निगमने 977.07 दशलक्ष युनिट एकूण ऊर्जा एका दिवसात तयार करण्याचा टप्पा केला पार

Posted On: 29 JUL 2020 3:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जुलै 2020

ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ( एनटीपीसी)  या देशातील  सर्वात मोठ्या  ऊर्जा निर्माण संस्थेने दिलेल्या माहितीनुसार  28 जुलै 2020 रोजी एका दिवसात 977.07 दशलक्ष यूनिट(MU) तयार करून एका दिवसात सर्वात जास्त ऊर्जा निर्माण करण्याचा नवा उच्चांक एनटीपीसीने प्रस्थापित केला. एनटीपीसीने तयार केलेल्या या एकूण निर्मिती मधे कंपनीच्या सहाय्यक आणि संयुक्त कंपन्यांनी तयार केलेल्या ऊर्जेचाही समावेश आहे.

एनटीपीसीची कोरबा,सीपत आणि लारा ही छत्तीसगडमधील,ताल्चेर कानिहा हे ओरिसातील आणि, कोल्डम हे हिमाचल प्रदेशातील जलविद्युत केंद्र, अशा पाच ऊर्जा केंद्रांनी असाधारण कामगिरी करत 100 टक्के  प्लँट लोड फँक्टर(PLF) यादिवशी साध्य केला.यापूर्वी 12 मार्च 2019 मध्ये एनटीपीसीने एका दिवशी 935.46 मि.यू.एवढे ऊर्जा उत्पादन केले होते.

एनटीपीसीची दररोज 62910 मि.यू एकूण ऊर्जा उत्पादित करण्याची क्षमता असून ,एनटीपीसीची देशभरात 24 कोळशावर चालणारी,7 वायू/ द्रवइंधन,1जलविद्युत, 13 नवीकरणीय औष्णिक केंद्रे असून 25 सहाय्यक आणि संयुक्त अशी जलविद्युत केंद्रे आहेत.

 

G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1642023) Visitor Counter : 164