रेल्वे मंत्रालय

कोविड 19 संबंधित आव्हाने पेलत रेल्वेची माल वाहतूक मागील वर्षीच्या तुलनेत जास्त


मागील वर्षी सम दिनाच्या तुलनेत या वर्षीच्या 27 जुलै रोजी 3.13 मेट्रिक टन मालाची  जास्त वाहतूक

Posted On: 28 JUL 2020 8:32PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेने कोविड – 19 संबंधित आव्हाने असताना मागील वर्षाच्या तुलनेत मालवाहतुकीचा लक्षवेधी टप्पा गाठला आहे. 27 जुलै 2020 रोजी वाहतुकीसाठी चढविलेला माल 3.13 मेट्रिक टन होता जो त्याच तारखेला मागील वर्षीपेक्षा जास्त आहे. 

टाळेबंदीच्या काळात माननीय पंतप्रधानांनी दीर्घमुदतीचे आणि दूरगामी लक्ष्य गाठण्यावर भर दिला असून, त्यानुसार, या काळात रेल्वेने पायाभूत सुविधांची जवळपास 200 कामे पूर्ण केली आहेत.

आता रेल्वेने मालवाहतुकीमध्ये देखील लक्षवेधी टप्पा गाठला आहे. 27 जुलै रोजी मालवाहतूक गाड्यांचा सरासरी वेग ताशी 46.16 किलोमीटर होता. जो मागील वर्षीच्या वेगाच्या (ताशी 22.52 किलोमीटर) तुलनेत दुप्पट आहे. जुलै महिन्यात मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचा सरासरी वेग ताशी 45.03 किलोमीटर आहे जो मागील महिन्याच्या (ताशी 23.22 किलोमीटर) तुलनेत दुप्पट आहे.

पश्चिम मध्य रेल्वे ताशी 54.23 किलोमीटर वेगाने, ईशान्य सीमेवरील रेल्वेचा वेग ताशी 51 किलोमीटर आहे, पूर्व मध्य रेल्वे ताशी 50.24 किलोमीटर वेगाने, पूर्व किनारी रेल्वेचा वेग ताशी 41.78 किलोमीटर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा वेग ताशी 42.83 किलोमीटर, दक्षिण पूर्व रेल्वेचा वेग ताशी 43.24 किलोमीटर आणि पश्चिम रेल्वेचा वेग ताशी 44.4 किलोमीटर, हे रेल्वे विभाग मालवाहतुकीत भारतीय रेल्वेच्या सरासरी वेगातील अग्रगण्य विभाग ठरले आहेत. 

 27 जुलै 2020 रोजी भारतीय रेल्वेचे मालवाहतुकीचे एकूण 1039 डबे वाहून नेण्यात आले, या पैकी 76 बोगी अन्नधान्य, 67 बोगी खते, 49 बोगी पोलाद, 113 बोगी सिमेंट, 113 बोगी लोह आणि 363 बोगी कोळसा वाहून नेण्यात आला. 

हे लक्षात घेतले जाऊ शकते की, मालवाहतुकीतील सुधारणा संस्थात्मक करून त्यांचा आगामी ``झीरो बेस्ड टाइम टेबल``मध्ये समावेश केला जाईल. या उचललेल्या पावलांमुळे रेल्वेसाठी मालवाहू वाहतुकीचे उत्पन्न लक्षवेधी पद्धतीने उंचावेल आणि रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल आणि संपूर्ण देशासाठी स्पर्धात्मक रसद खर्च उपलब्ध होईल, हे लक्षात घ्यायले हवे.

रेल्वेची मालवाहतूक अतिशय आकर्षक करण्यासाठी भारतीय रेल्वेमध्ये बऱ्याच सवलती दिल्या जात आहे, ही बाब देखील लक्षात घेण्यासारखी आहे.

कोविड 19 चा उपयोग रेल्वेने सर्व बाजूंनी आपली कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारण्यासाठी केला आहे.

...

B.Gokhale/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641903) Visitor Counter : 193