भूविज्ञान मंत्रालय

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त एमओईएस-ज्ञान संसाधन केंद्र नेटवर्क (KRCNet)ची सुरुवात

Posted On: 27 JUL 2020 8:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जुलै 2020

 

भारत सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने (एमओईएस) जागतिक दर्जाचे ज्ञान संसाधन केंद्र नेटवर्क (केआरसीनेट) विकसित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नेत्रदीपक घडामोडी लक्षात घेत, एमओईएस प्रणालीच्या पारंपारिक ग्रंथालयाला अव्वल दर्जाच्या ज्ञान संसाधन केंद्रामध्ये (केआरसी) वर्गीकृत केले जाईल. केआरसीला एकमेकांशी जोडण्यात येईल आणि केआरसीनेट पोर्टलमध्ये एकीकृत केले जाईल. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या बौद्धिक जगात (एमओईएस) हा एकल बिंदू प्रवेश असेल.

एमओईएस प्रणालीची संसाधने आणि सेवा एक बिंदू सक्रीय, अद्ययावत आणि एकीकृत केआरसीनेट पोर्टलद्वारे 24 तास उपलब्ध असतील. एमओईएस मुख्यालयात एक पथदर्शी प्रकल्प विकसित केला गेला आहे जो इतर एमओई संस्थांशी एकत्रित केला जाईल.

केआरसीनेटची प्रमुख उद्दिष्ट्ये:

  • एमओईएस ज्ञान संसाधनांचे दस्तऐवजीकरण, त्याची देखभाल, सुलभ पुनर्प्राप्ती आणि प्रसार यासाठी आयएसओ प्रमाणपत्र मिळवून एकूण गुणवत्ता व्यवस्थापन (टीक्यूएम) प्रणाली स्थापित करणे.
  • एमओईएस मुख्यालय आणि त्याच्या संस्थांमध्ये उपलब्ध बौद्धिक संसाधने, उत्पादने आणि प्रकल्प परिणाम संग्रहित, एकत्र, विश्लेषण, अनुक्रमणिका, संग्रह आणि प्रसारित करणे.
  • एमओईएस सेवांसह एमओईएस मुख्यालय आणि MoES संस्थांमध्ये उपलब्ध मुद्रण आणि डिजिटल संसाधनांचा अद्ययावत मेटा-डेटा विकसित आणि देखरेख करणे.
  • केआरसीनेट पोर्टलद्वारे सदस्यता ज्ञान सामग्री 24 तास उपलब्ध.
  • धोरण तयार करणे, अहवाल तयार करणे आणि माहिती प्रसारणासाठी बिब्लियोमेट्रिक्स, साइंटोमेट्रिक्स, बिग-डेटा एनालिटिक्स, सोशल मीडिया एनालिटिक्स इत्यादी सारखी माहिती विश्लेषणात्मक आणि तंत्रज्ञान साधने.
  • इलेक्ट्रॉनिक जर्नल्स, डेटाबेस, डिजिटल उत्पादने, डेटा विश्लेषक इत्यादींचा वापर लोकप्रिय करण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करणे.

 

* * *

M.Chopade/S.Mhatre/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1641619) Visitor Counter : 187