भूविज्ञान मंत्रालय
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केला स्थापना दिन साजरा
“पृथ्वी विज्ञान कौशल्ये” ही “जीवन कौशल्ये” बनतात म्हणून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडे “जीवन कौशल्य मंत्रालय” म्हणून बघता येईल : डॉ. हर्ष वर्धन
प्रविष्टि तिथि:
27 JUL 2020 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2020
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, विज्ञान व तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज सांगितले की, “पृथ्वी विज्ञान मंत्रालय ही जगातील एक अद्वितीय संस्था आहे जी पृथ्वी विज्ञानच्या सर्व शाखा - वातावरण, जलावरण (हायड्रोस्फीअर), निम्नतापावरण (क्रायोस्फीयर) आणि शिलावरण (लिथोस्फीयर) या सर्व शाखांकडे समग्र दृष्टीकोनातून पाहते.” “भारत एकमेव असा एकमेव देश आहे जिथे पृथ्वी विज्ञानातील सर्व बाबींकडे लक्ष देण्यासाठी संपूर्णतः समर्पित एक मंत्रालय कार्यरत आहे” असेही ते म्हणाले. हे कमीतकमी विलंबासह नियोजित पद्धतीने मोठ्या चिंता सोडविण्यात एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्यास मदत करते. अलिकडच्या काळात मंत्रालयाने इतर देशांनी अनुकरण करण्याजोग्या जागतिक दर्जाच्या अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी केल्या आहेत."
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आज आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. हर्ष वर्धन बोलत होते. 2006 मध्ये भारतीय हवामानशास्त्र विभाग, नेशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ट्रॉपिकल वेदरोलॉजी, अर्थ रिस्क इवैल्यूएशन सेंटर आणि सागरी विकास मंत्रालय यांचे विलीनीकरण केल्यानंतर पृथ्वी विज्ञान मंत्रालायची स्थापना करण्यात आली.
“हवामान आणि हवामान विज्ञान विषयी, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, उष्णता लहरी आणि पूर यासंदर्भात अचूक इशारे देऊन आपत्ती व्यवस्थापनासाठीची जगातील सर्वोत्तम हवामान सेवा भारतामध्ये आहे”, याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले. आयएमडी ईएससीएपी पॅनेलच्या अंतर्गत 13 सदस्य देशांना उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आणि वादळ याविषयी सल्ला देते."
ते म्हणाले, “भारताने प्रथमच भविष्यातील हवामान अंदाज बांधण्यासाठी पृथ्वी प्रणाली मॉडेलही विकसित केले आहे. या मॉडेलची क्षमता अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान आणि जर्मनीमधील इतर मॉडेलिंग केंद्रांच्या बरोबरीची आहे. मंत्रालयाने दोन वर्षात दोन विमानांचा प्रयोग करून कृत्रिम पाऊस (क्लाउड सीडिंग) याचे फायदे तोटे समजून घेण्यासाठी एक प्रयोग सुरू केला आहे. या प्रयोगाने क्लाउड सीडिंगची कार्यक्षमता दर्शविण्यासाठी ढगांचे 234 नमुने गोळा केले आहेत. अमेरिका सारख्या फारच कमी देशांनी या प्रकारे मोठ्या प्रमाणावर क्लाउड सीडिंग प्रयोग केले आहेत.”
डॉ. हर्षवर्धन यांनी जाहीर केले की "वायुमंडलीय संशोधन चाचणी सुरू झाल्यावर 2021 मध्ये पहिल्या टप्प्यातील उपकरणांसह उष्णकटिबंधीय क्षेत्रात एक अनोखी सुविधा सुरू केली जाईल. ही प्रस्तावित खुली वेधशाळा 100 एकर क्षेत्रफळावर (भोपाळपासून 50 कि.मी. दूर) उभारण्याचे नियोजन असून यामुळे पावसाळ्यातील ढग आणि भू-पृष्ठभागाच्या प्रक्रियेबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे शक्य होईल."
या प्रसंगी, एमओईएस-नॉलेज रिसोर्स सेंटर नेटवर्क (केआरसीनेट) आणि भारतीय हवामान विभागासाठी "मौसम" मोबाइल अॅप देखील सुरू करण्यात आले.
"मागील काही महिन्यांमध्ये आयएमडीने उष्णकटिबंधीय चक्रीवादळ अम्फान आणि निसर्ग याविषयी अचूक भविष्यवाणी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेद्वारे उत्कृष्ट कार्य केल्यामुळे हजारो लोकांचे जीव वाचविण्यात मदत झाली”, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने मुंबईच्या पूरप्रवण क्षेत्रांचा त्रास कमी करून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबई (IFLOWS-Mumbai) साठी एकात्मिक पूर चेतावणी प्रणाली विकसित करून कार्यान्वित केली आहे.
देशातील किनारपट्टी व समुद्री संशोधन क्षमता वाढविण्याला भारत सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये 'सागर अन्वेशीका' हे नवीन तटस्थ संशोधन जहाज सुरू केले. भारतातील खाजगी क्षेत्राबरोबर सरकारची भागीदारी आणि 'मेक इन इंडिया' ला चालना देण्यासाठी किनारपट्टीवरील संशोधनाच्या इतिहासामधील ही आतापर्यंतची उल्लेखनीय घडामोड आहे.
* * *
M.Chopade/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1641549)
आगंतुक पटल : 357