गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना 82 व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
सीआरपीएफ शौर्य, धैर्य आणि त्यागाचे प्रतिक; सीआरपीएफने वेळोवेळी देशाचा गौरव वाढवला
कोविड-19 च्या काळात समाजाच्या सेवेप्रती सीआरपीएफचा त्याग अतुलनीय: अमित शाह
Posted On:
27 JUL 2020 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2020
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना 82 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री आपल्या ट्वीट संदेशात म्हणतात “मी लाखो भारतीयांसह सीआरपीएफ जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना 82 व्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो. सीआरपीएफ म्हणजे शौर्य, धैर्य आणि त्यागाचे प्रतिक आहे. वेळोवेळी सीआरपीएफने देशाभिमानास्पद कामगिरी केली आहे”. अमित शाह पुढे म्हणतात, केंद्रीय राखीव पोलीस दलाने कोविड-19 च्या काळात समाजसेवेसाठी केलेला त्याग अतुलनीय आहे”.
केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना 27 जुलै 1939 रोजी “क्राऊन रिप्रेझेन्टेटीव्ह पोलिस” च्या रुपाने झाली होती. 28 डिसेंबर 1949 रोजी सीआरपीएफ कायद्यान्वये केंद्रीय राखीव पोलीस दल असे नाव झाले. आज सीआरपीएफने गौरवशाली इतिहासाची 82 वर्षे पूर्ण केली आहेत.
* * *
M.Chopade/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1641538)
Visitor Counter : 258