गृह मंत्रालय
केन्द्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी कारगिल विजय दिवसाच्या 21व्या वर्धापनदिनानिमित्त देशाच्या शूरवीरांचे साहस आणि पराक्रम यांचे स्मरण करीत त्यांना अभिवादन केले
कारगिल विजय दिवस हा भारताचा स्वाभिमान, अतुलनीय शौर्य आणि दृढ़ नेतृत्व यांचे प्रतीक आहे: केन्द्रीय गृह मंत्री
“मी त्या शूर वीरांना नमन करतो ज्यांनी आपल्या शौर्याने कारगिलच्या दुर्गम डोंगरावरून शत्रूला हुसकावून लावत पुन्हा तिथे तिरंगा फडकावला. मातृभूमिच्या रक्षणासाठी समर्पित भारताच्या वीरांचा देशाला अभिमान आहे.” -अमित शाह
प्रविष्टि तिथि:
26 JUL 2020 11:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जुलै 2020
कारगिल विजय दिवसाच्या 21व्या वर्धापनदिनानिमित्त देशाच्या शूरवीरांचे साहस आणि पराक्रम यांचे स्मरण करीत केन्द्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केले आहे. “मी त्या शूर वीरांना नमन करतो ज्यांनी आपल्या शौर्याने कारगिलच्या दुर्गम डोंगरावरून शत्रूला हुसकावून लावत पुन्हा तिथे तिरंगा फडकावला. मातृभूमिच्या रक्षणासाठी समर्पित भारताच्या वीरांचा देशाला अभिमान आहे.” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
26 जुलै 1999 रोजी भारतीय सेनेने ऑपरेशन विजय अंतर्गत पाकिस्तानचा पराभव केला होता; तेव्हापासून देशाच्या शूरवीरांच्या अगम्य साहस, पराक्रम आणि त्यांच्या अमर बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1641458)
आगंतुक पटल : 232
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu