रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेची ई- खरेदी प्रणाली आयआरईपीएस सरकारी ई बाजारपेठाशी एकीकृत करणार

Posted On: 25 JUL 2020 9:44PM by PIB Mumbai

 

रेल्वे आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केंद्र सरकार आणि भारतीय रेल्वेच्या खरेदी प्रक्रियेत मेक इन इंडिया उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. भारतीय रेल्वेसाठी  भ्रष्टाचार मुक्त आणि  पारदर्शी खरेदी वातावरण विकसित करून  उद्योग क्षेत्रात विश्वास निर्माण व्हावा यासाठी पावले उचलावीत असे आवाहन त्यांनी केले.

खरेदी प्रक्रियेत मेक इन इंडिया  उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेताना त्यांनी खरेदी प्रक्रियेत स्थानिक विक्रेत्यांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला. खरेदीतला स्थानिक विषयक कलम असे असावे ज्याद्वारे स्थानिक विक्रेते किंवा पुरवठादार यांच्या कडून अधिक बोली मिळतील.यामुळे आत्म निर्भर भारत अभियानाला चालना मिळणार आहे. भारतीय रेल्वेच्या या प्रयत्नात मदत म्हणून आवश्यकता भासल्यास योग्य धोरण आढावा घेण्यासाठी डीपीआयआयटीची मदत घेण्यात येणार आहे.  स्थानिक पातळीवर निर्मिती केलेली अधिक उत्पादने  पुरवणाऱ्या  विक्रेत्याला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. खरेदी प्रक्रीये बाबत विविध मुद्यांबाबत स्पष्टता यावी यासाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न हा विभाग आणि हेल्पलाईन क्रमांक निर्माण करण्याची सूचनाही करण्यात आली.

सामग्री व्यवस्थापन सदस्य, रेल्वे मंडळ यांनी मेक इन इंडिया ला प्रोत्साहन आणि सरकारी ई- बाजारपेठा मार्फत खरेदी करण्यासाठी उचलण्यात आलेली पावले आणि यासंदर्भातली  प्रगती याबाबत तपशीलवार सादरीकरण केले. रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगदी, रेल्वे मंडळ सदस्य, डीपीआयआयटीचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. 

सरकारी ई बाजारपेठ हि सार्वजनिक खरेदीतली नवोन्मेशी कल्पना आहे. दुर्गम भागातले उद्योग  विशेषतः एमएसएमईसाठी बाजारपेठ मिळावी यासाठी रेल्वे वस्तू आणि सेवा यांची सुमारे सत्तर हजार कोटी  रुपयांची खरेदी सरकारी ई बाजारपेठे मार्फत होण्याच्या गरजेवर गोयल यांनी भर दिला.

भारतीय रेल्वे ही भारत सरकारच्या सर्वात मोठ्या खरेदी एजन्सीपैकी एक मोठी एजन्सी, सरकारी ई बाजारपेठेचा क्षमतांचा संपूर्ण वापर करण्यासाठी आपली  खरेदी प्रणाली सरकारी ई बाजारपेठेशी एकीकृत करत आहे.

 

भारतात भ्रष्टाचार मुक्त सार्वजनिक खरेदी वातावरण निर्माण करण्यासाठीच्या मार्गांवर बैठकीत चर्चा झाली, यात रेल्वे, डीपीआयआयटी आणि सरकारी ई बाजारपेठा यांना अतिशय महत्वाची भूमिका बजावायची आहे. 

रेल्वेने आपल्या सर्व व्यवहारासाठी वापरकर्त्यांना अधिक सुलभ वाटेल अशी सिंगल स्टेप वेन्डोर वेब आधारित इंटरफेस आणण्याच्या दिशेने काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. भारतीय रेल्वे समवेत कसा व्यवसाय करायचा याबाबत  या संकेत स्थळावर उत्सुक विक्रेत्याला स्पष्ट कल्पना पुरवण्यात येईल. भारतीय रेल्वेच्या  भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी वातावरणाचा  विश्वास निर्माण करणारी सर्व माहिती या संकेत स्थळावर उपलब्ध राहणार आहे.

****

B.Gokhale/N.Chiitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1641296) Visitor Counter : 29