इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

व्यक्तिगत नसलेल्या माहितीच्या व्यवस्थापन आराखड्यासंदर्भात तज्ञ समितीने अभिप्राय मागवले

Posted On: 23 JUL 2020 11:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2020

 

व्यक्तिगत नसलेल्या माहितीच्या व्यवस्थापन आराखड्यासंदर्भातील तज्ञ समितीने आज एका आभासी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्तिगत नसलेल्या माहितीच्या व्यवस्थापनाच्या विविध पैलुंबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. क्रिश गोपालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या इतर सदस्यांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली.  त्यांनी आणि समितीच्या इतर सदस्यांनी व्यक्तिगत नसलेल्या माहिती संदर्भातील काही उदयोन्मुख आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांबाबत माहिती दिली. व्यक्तिगत नसलेल्या माहितीची व्याख्या आणि सामुदायिक माहितीची संकल्पना, माहितीचे अधिकार आणि विशेषाधिकार, माहितीचे तीन प्रकार - सार्वजनिक, सामुदायिक आणि खाजगी, डेटा बिझनेस या नव्या संकल्पनेची व्याख्या, मेटा डेटा रजिस्टर मधील माहितीची उपलब्धता, माहिती अनामिक करण्यासाठीची परवानगी, व्यक्तीगत नसलेल्या माहितीची संवेदनशीलता, माहिती प्रदान करण्याचे स्वतंत्र हेतू, सार्वजनिक हितसंबंध आणि आर्थिक हेतू अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. 

कच्ची आणि व्युत्पन्न माहिती देणे, व्यक्तिगत नसलेल्या माहितीचे नियामक पैलू, माहितीचे आर्थिक मूल्य आणि भारतीय नागरिक तसेच भारतीय नागरिकांना लाभ प्रदान करण्याच्या दृष्टीने व्यक्तिगत नसलेल्या माहितीच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या डिजिटल नियामक आराखड्याशी संबंधित विविध कायदेशीर बाबींविषयी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही समितीने दिली. 

प्रसार माध्यमांनी या मसुदा अहवालावर सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होण्यास अधिकाधिक हितधारकांना प्रोत्साहित करावे, अशी विनंती तज्ञ समीतीने केली आहे. इच्छुकांना येत्या 3 ऑगस्ट 2020 पर्यंत आपले अभिप्राय पाठविता येतील.

https://www.mygov.in/task/share-your-inputs-draft-non-personal-data-governance-framework/

 

* * *

U.Ujgare/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1640839) Visitor Counter : 253