संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन प्रदान

Posted On: 23 JUL 2020 11:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2020

 

संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करात महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन (पीसी) प्रदान करण्यासाठीचे औपचारिक सरकारी मंजुरी पत्र जारी केले आहे. यामुळे अशा प्रकारच्या संस्थेमध्ये महत्वाच्या पदांवर काम करण्याचा महिला अधिकाऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या आदेशामुळे न्यायाधिश तसेच ॲडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एजुकेशनल कॉर्प्स (एईसी) च्या विद्यमान प्रवर्गांबरोबरच भारतीय लष्कराच्या आर्मी एअर डिफेन्स (AAD), सिग्नल, अभियंते, आर्मी एव्हिएशन, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल अभियंते, आर्मी सर्व्हिस कॉर्प्स, आर्मी ऑर्डनन्स कार्प्स आणि इंटेलिजन्स कॉर्प्स अशा सर्व दहा शाखांमधील शॉर्ट सर्व्हीस कमिशन्ड महिला अधिकाऱ्यांना स्थायी कमीशन (पीसी) प्राप्त होणार आहे.

त्या अनुषंगाने लष्कर मुख्यालयाने संबंधित महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी निवड मंडळाच्या कामांची पूर्वतयारी केली आहे. सर्व संबंधित एसएससी महिला अधिकाऱ्यांनी आपापल्या पर्यायांचा वापर करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर लगेचच निवड मंडळाचे काम सुरू होईल. 

सेवेतील महिला अधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचार्‍यांना राष्ट्राच्या सेवेसाठी समान संधी उपलब्ध करुन देण्याप्रती भारतीय लष्कर कटीबद्ध आहे.


* * *

U.Ujgare/M.Pange/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1640832) Visitor Counter : 283