रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून टायर्स, सुरक्षा काच, वाहनांगबाह्य साधने यांच्यासाठी सीएमव्हीआरअंतर्गत अधिसूचना प्रसिद्ध
Posted On:
22 JUL 2020 4:50PM by PIB Mumbai
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 20 जुलै 2020 रोजीच्या जीएसआर 457 (E) नूसार, केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये पुढील दुरुस्त्या केल्या आहेत-
3.5 टन वजनाच्या वाहनांमध्ये टायर दाब निगराणी प्रणाली (TPMS)ची आवश्यकता. यामुळे टायरचा बदलता दाब गाडी धावतानाही चालकाच्या लक्षात येऊन रस्ते सुरक्षा वृद्धिंगत होईल.
टायर दुरुस्ती कीटची शिफारस करण्यात आली आहे : टायर (ट्युबलेस टायर) पंक्चर झाल्यास, दुरुस्ती कीटच्या सहाय्याने दुरुस्ती करता येईल.
टायर दुरुस्ती कीट आणि टीपीएमएस असलेल्या वाहनांना अतिरिक्त टायर्सची आवश्यकता भासणार नाही. आंतरराष्ट्रीय मानकांनूसार यामुळे इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरी ठेवण्यास पुरेसी जागा उपलब्ध होईल.
सुरक्षा काचांना अनुरूप ग्लेजिंगचा वापरण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. मात्र, याचे प्रमाण समोरच्या आणि मागच्या खिडक्यांसाठी (70%) आणि बाजूच्या खिडक्यांसाठी (50%) असे ठेवण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त, सीएमवीआर अंतर्गत दुचाकी बाह्यप्रोजेक्शनच्या आवश्यकतेसाठी कोणतेही मानक नव्हते. आता, पादचारी तसेच वेगवान गाड्यांची धडक लागून अपंगत्व येण्याच्या प्रमाणात घट होण्यासाठी प्रमाणित करण्यात आले आहे. यातील मानक निर्धारणानुसार टेस्टींग डिव्हाईसच्या संपर्कात सर्व घटक असतील, जे विशिष्ट मापाचे आणि सॉफ्ट मटेरिअलपासून तयार केले असतील.
दुचाकीवर मागे बसलेल्या पिलियन रायडरला परवानगी देण्यात आली आहे. सामान ठेवण्याच्या जागेवर हलके वजन कंटेनर ठेवण्यास उत्पादक आणि चाचणी संस्थेकडून मान्यता मिळाल्यास ठेवण्यास मुभा आहे.
कृषी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसाठी यांत्रिक जोड (मेकानिकल कपलिंग) ऐच्छिक ठेवण्यात आले आहे.
***
G.Chippalkatti/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1640423)
Visitor Counter : 225