संरक्षण मंत्रालय
भारतीय हवाईदलात राफेलचा समावेश
प्रविष्टि तिथि:
20 JUL 2020 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2020
भारतीय हवाई दलाच्या पाच राफेल विमानांची पहिली तुकडी जुलै 2020च्या अखेरीला भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. 29 जुलै रोजी अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर हवामानाच्या स्थितीनुसार या तुकडीचा हवाई दलाच्या ताफ्यात समावेश करण्यात येईल. या विमानांच्या आगमनाच्या वेळी प्रसारमाध्यमांच्या वार्तांकनाचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. हवाई दलाच्या ताफ्यात या विमानांचा समावेश करण्याचा मुख्य सोहळा ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात 20 तारखेला होईल ज्यावेळी या सोहळ्याचे संपूर्ण वार्तांकन करण्याचे नियोजन केले जाईल.
या विमानाचे भारतीय हवाई दलाच्या हवाई उड्डाण कर्मचाऱ्यांना आणि जमिनीवरील कर्मचाऱ्यांना सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये या विमानातील अत्याधुनिक शस्त्र प्रणालीच्या हाताळणीचाही समावेश असून त्यांच्या परिचालनासाठी आता ते पूर्णपणे सज्ज आहेत. या विमानांच्या आगमनानंतर लवकरात लवकर या विमानांच्या परिचालनावर भर देण्यात येईल.
M.Chopade/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1640070)
आगंतुक पटल : 298