संरक्षण मंत्रालय

मेक इन इंडिया’ उपक्रमाला मोठी चालना


संरक्षण मंत्रालयाचा भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडसोबत T-90 रणगाड्यासाठी लागणाऱ्या 1,512 भूसुरंग शोध उपकरणांच्या खरेदीसाठी करार

Posted On: 20 JUL 2020 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जुलै 2020

सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला चालना देण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या मंजूरीनंतर, संरक्षण मंत्रालयाच्या खरेदी शाखेने आज भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) सोबत T-90 एस/एसके या  रणगाड्यासाठी लागणाऱ्या 1,512 भूसुरुंगविरोधी उपकरणांच्या, अंदाजे 557 कोटी रुपये खरेदी संदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या केल्या. खरेदी करारानूसार, उत्पादनाचा 50 टक्के भाग स्वदेशात निर्मित असला पाहिजे.

भूसुरुंग उद्धवस्त करण्यासाठी लागणारी उपकरणे भारतीय लष्कराच्या T-90 रणगाड्यांमध्ये बसवण्यात येणार आहेत, यामुळे रणगाड्यांची सुरुंगक्षेत्रातील वाहतूक सुलभ होईल. तसेच रणगाड्यांची गतीशीलता अनेक पटींनी वाढेल आणि भूसुरुंगाला बळी न पडता शत्रू प्रदेशात दूरपर्यंत जाता येईल.

भूसुरुंग उद्धवस्त करण्यासाठी लागणारी 1,512 उपकरणे 2027 पर्यंत मिळतील, यामुळे लष्कराची युद्धक्षमता आणखी वाढेल.

M.Chopade/S.Thakur/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1640061) Visitor Counter : 176