अल्पसंख्यांक मंत्रालय

“सुधारणा हे केवळ नियमन नसून देश आणि मानव जातीच्या प्रगतीसाठी केलेला निर्धार आहे”, केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी,


दिल्ली विद्यापीठाच्या उच्च शिक्षण विकास केंद्राच्या एका कार्यक्रमाला संबोधन

“आणीबाणीच्या प्रसंगात सरकार, समाज , चित्रपट आणि इतर माध्यमांनी एक आत्मा आणि चार शरीरे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे.”, मुख्तार अब्बास नक्वी

Posted On: 20 JUL 2020 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जुलै 2020

 

केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज म्हटले आहे की, सामाजिक सुधारणा हे केवळ नियमन नसून  देश आणि मानव जातीच्या प्रगतीसाठी केलेला निर्धार आहे .  देश आणि पिढ्यान पिढ्यांच्या विकासासाठी पत्रकारिता माध्यमे आणि चित्रपटांची भूमिका या विषयावर ते बोलत होते. नवी दिल्ली विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणामधील व्यावसायिक विकास केंद्राचे उद्‌घाटन करताना देश आणि  पिढ्यांच्या विकासासाठी पत्रकारिता, माध्यमे आणि चित्रपटांची भूमिका या विषयावर ते बोलत होते.  ते पुढे म्हणाले की सरकार ,राजकारण ,चित्रपट आणि माध्यमे  समाजाच्या एका नाजूक धाग्याने एकमेकांशी  जोडलेली  आहेत . धैर्य, निष्ठा आणि सावधानता ह्या, या परस्पर संबंधांना बळकटी देण्यारे मंत्र आहेत.

नक्वी पुढे म्हणाले, आणीबाणीच्या प्रसंगी सरकार, समाज, चित्रपट आणि माध्यमे हे एक आत्मा आणि चार शरीरे  याप्रमाणे काम करतात. जेव्हा जेव्हा देशामध्ये अडचणीचा काळ होता ,मग तो स्वातंत्र्यापूर्वी असो किंवा स्वातंत्र्यानंतर, हे सर्व चार भाग नेहमीच त्यांची कर्तव्ये पूर्ण प्रामाणिकपणे आणि देशाच्या हितासाठी  आणि मानवजातीच्या कल्याणासाठी पार पाडत  आली आहेत.

अनेक शतकांनंतर संपूर्ण जग कोरोना महामारी च्या रूपात एका मोठ्या आणीबाणीला तोंड देत आहे. गेल्या अनेक पिढ्यांनी अशा प्रकारचे आव्हान पाहिलेले नाही. तरीही केवळ समाज आणि सरकारच नव्हे तर चित्रपट आणि माध्यमांनी देखील अतिशय परिपक्वतेने आपापली भूमिका बजावली आहे. विशेष करून भारतात या सर्व चार भागांनी मिळून या समस्येवर  उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या सहा महिन्यात लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ मानला  जाणाऱ्या या पत्रकारिता माध्यमात  तसेच समाज, व्यवस्था आणि चित्रपट माध्यमाच्या कार्यसंस्कृतीत, चारित्र्य आणि निष्ठेमध्ये क्रांतिकारक बदल घडून आला आहे. सुधारणा केवळ नियमांमुळे होत नाही तर  मनाच्या निर्धारामुळे प्रत्यक्षात येतात.

वर्तमानपत्रांची छपाई  बराच काळ  बंद राहिली. चित्रपट मोठ्या पडद्यावरून छोट्या पडद्याकडे गेला, कधीकधी ऑनलाईन सुद्धा गेला. अनेक देशांमध्ये जनतेला ऑनलाइन बातम्यांची आणि माहितीची सवय झाली. परंतु भारतातल्या लोकसंख्येच्या एका मोठ्या भागाला दिवसाचे काम सुरू करण्याआधी वृत्तपत्र वाचनाची लागलेली सवय तशीच राहिली.

मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, या कोरोना  महामारी तसेच लॉकडाऊन काळातही लोकांनी चित्रपट आणि माध्यमांना निरोप दिला नाही.जरी इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि डिजिटल व्यासपीठांचे फारसे नुकसान झाले नाही, तरी बहुतेक सर्व न्यूज चैनल आणि डिजिटल व्यासपीठांनी या महामारी च्या खऱ्या बातम्या आणि माहितीच्या ऐवजी  एक भयंकर चित्र रेखण्यावरती भर दिला होता. अशा अर्थाने ते समाजापर्यंत प्रभावी आणि उपयुक्त माहिती पोचवण्याची जबाबदारी ओळखून कर्तव्य बजावण्यात थोडे कमी पडले. माध्यमे केवळ जनजागृतीच करत नाहीत तर शासन व्यवस्थेला विधायक टीकेद्वारे सावधही करतात.

 

M.Chopade/U.Raikar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1639933) Visitor Counter : 231