अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2018-19 साठीची प्राप्तिकर विवरणपत्रे स्वयंस्फूर्तीने भरण्याबाबत केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळ येत्या 20 जुलैपासून ई-जनजागृती मोहीम सुरु करणार
Posted On:
18 JUL 2020 8:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2020
करदात्यांच्या सुविधेसाठी,आर्थिक वर्ष 2018-19 साठीची प्राप्तिकर विवरणपत्रे स्वतःहून भरण्याबाबत माहिती देणारी ई-जनजागृती मोहीम, येत्या सोमवारपासून म्हणजे 20 जुलै 2020 पासून सुरु करण्याचा निर्णय CBDT म्हणजेच केंद्रोय प्रत्यक्ष कर मंडळाने घेतला आहे. ही 11 दिवसांची मोहीम 31 जुलै 2020 ला संपणार आहे. जे करदाते करविवरण पत्र भरत नाहीत किंवा ज्यांचे करविवरणपत्रात त्रुटी किंवा अपूर्ण माहिती आहे, त्यांच्यासाठी विशेषत्वाने ही मोहीम राबवली जाणार आहे.
या मोहिमेचे उद्दिष्ट करदात्यांना विवरणपत्रे भरण्यासाठी त्यांची करविषयक / इतर व्यवहारांची माहिती ऑनलाईन उपलब्ध करुन देणे हा आहे. प्राप्तीकर विभागाकडे या करदात्यांच्या ऑनलाईन व्यवहारांची जी माहिती असेल, ती त्यांना दिली जाईल.जेणेकरुन त्या आधारे, त्यांना स्वतःच, कोणाच्याही मदतीविना करविवरणपत्रे भरता येतील. या करदात्यांना विभागाची नोटीस किंवा छाननी असे प्रकार टाळता येतील.
ही ई-मोहीम करदात्यांच्या सुविधेसाठी राबवली जाणर आहे. या अंतर्गत, कर विभाग करदात्यांना मेल किंवा एसएमएस पाठवून त्यांनी केलेल्या व्यवहारांची पडताळणी करेल. यात त्याच्या व्यवहारांची माहिती देणारे विविध स्त्रोत, जसे वित्तीय व्यवहार, टीडीएस, टीसीएस, परदेशातून आलेला पैसा इत्यादींचा वापर केला जाईल. त्याशिवाय, जीएसटी, निर्यात-आयात आणि शेअर बाजारात केलेल्या व्यवहारांशी संबंधित माहिती सुद्धा संकलित केली जाईल.
डेटा विश्लेषणात असे आढळून आले आहे, की काही करदात्यांनी, ज्यांचे मोठमोठे आर्थिक व्यवहार आहेत, त्यांनी, आर्थिक वर्ष 2019-20 साठीची विवरणपत्रे भरलेली नाहीत.या करदात्यांशिवाय, काही असे करदातेही आहेत, ज्यांचे आर्थिक व्यवहार आणि प्राप्तिकर विवरणपत्रे यांचा ताळमेळ जुळत नाही.
या ई-मोहिमेअंतर्गत, करदात्यांना त्यांच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्व माहिती एका निश्चित पोर्टलवर मिळू शकेल. त्यावर, पुढील तीनपैकी एक पर्याय निवडून ते त्यांचे उत्तरही लिहू शकतील- हे पर्याय म्हणजे -
1) माहिती योग्य आहे.
2) माहिती पूर्णपणे योग्य नाही.
3) माहिती इतर व्यक्ती / वर्षाशी संबंधित आहे.
4) एकच माहिती दोनदा वापरण्यात आली आहे. / इतर जाहीर माहितीत समाविष्ट करण्यात आली आहे.
5) माहिती देण्यात आलेली नाही. या पोर्टलमुळे करदात्यांना प्राप्तीकर कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज पडणार नाही.
प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची, त्यात दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2020 ही आहे. करदात्यांनी या ई मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन कर मंडळाने केले आहे.
* * *
B.Gokhale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639702)
Visitor Counter : 300