कृषी मंत्रालय
राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा आणि बिहारच्या 3.5 लाख हेक्टर क्षेत्रावर 16 जुलै 2020 पर्यंत टोळधाड नियंत्रण उपाययोजना करण्यात आली
राजस्थानमधील बारमेरच्या रामसर भागात आज आयएएफच्या हेलिकॉप्टरद्वारे टोळधाड प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या
प्रविष्टि तिथि:
17 JUL 2020 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2020
राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये 11 एप्रिल 2020 पासून 16 जुलै 2020 पर्यंत, टोळ नियंत्रण कार्यालयाद्वारे (एलसीओ) 1,76,055 हेक्टर क्षेत्रावर टोळ नियंत्रण उपाययोजना करण्यात आल्या. 16 जुलै 2020 पर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, हरियाणा आणि बिहार या राज्यांमधील 1,76,026 हेक्टर क्षेत्रावर राज्य सरकारांद्वारे टोळधाड नियंत्रण कामे करण्यात आली.
16 - 17 जुलै, 2020 च्या मध्यरात्री रात्री 9 जिल्ह्यांमधील 23 ठिकाणी नियंत्रण अभियान राबविले गेले. एलसीओद्वारे बारमेर, जोधपूर, बीकानेर, नागौर, चूरू, झुंझुनू, सीकर, जलोर आणि राजस्थानचा सिरोही व गुजरातचा कच्छ जिल्हा. या व्यतिरिक्त, संबंधित राज्य कृषी विभागांनी उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील 2 ठिकाणी आणि राजस्थानमधील पाली जिल्ह्यात एका ठिकाणी टोळधाडीविरोधात नियंत्रण अभियान राबविले.
आज राजस्थानमधील बारमेरच्या रामसर भागात भारतीय वायू दलाच्या (आयएएफच्या) हेलिकॉप्टरने टोळधाडीविरोधात उपाययोजना राबविल्या.

- राजस्थानच्या जोधपूरमधील बिलासपूर, डांगियावास येथे नियंत्रण कार्यक्रम
- उत्तर प्रदेशातील पूरनपूर, पीलीभीत येथे ड्रोनद्वारे कारवाई
- राजस्थानातील जोधपूरमधील थडा, देचू येथे नियंत्रण कार्यक्रम
- राजस्थानच्या जोधपूरमधील दानिगयवास येथे नियंत्रण उपाययोजना
- राजस्थानातील बिकानेर येथील टोखा येथे टोळांचा नायनाट
- राजस्थानमधील चुरू येथील अमरसर येथे टोळांचा नायनाट
आज (17 जुलै 2020), बारमेर, जोधपूर, बीकानेर, नागौर, चूरू, झुंझुनू, सीकर, जलोर आणि राजस्थानमधील सिरोही, गुजरातमधील कच्छ जिल्हा आणि उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यात अपरिपक्व गुलाबी टोळ व प्रौढ अवस्थेतील पिवळ्या टोळांचे झुंड सक्रिय आहेत.
S.Pophale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1639396)
आगंतुक पटल : 214