विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कोविड-19 विरोधातील लढाईत सामान तपासणी निर्जंतुक करण्यासाठी एआरसीआय आणि वेहंत टेक्नोलॉजी यांनी विकसित केली युव्ही यंत्रणा
Posted On:
17 JUL 2020 3:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2020
कोविड-19 संसर्ग पसरण्याचे मोठे कारण म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास. सामान हा प्रवासाचा अनिवार्य भाग असून प्रवासादरम्यान सामानाची हाताळणी अनेकांकडून होते, हे विषाणूच्या प्रसाराला कारणीभूत ठरते. म्हणूनच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हे सामान जाताना प्रत्येक वेळी ताबडतोब निर्जंतुक करणे आवश्यक ठरते. टाळेबंदीनंतरच्या काळात, व्यापारी आस्थापने, विमानतळ, रेल्वे स्थानकांत प्रवाशांची वर्दळ वाढल्यानंतर, कोविड -19 चा मुकाबला करण्याच्या दृष्टीने सामान काही सेकंदातच निर्जंतुक करणाऱ्या वेगवान यंत्रणेची तातडीने आवश्यकता आहे.
सामानातून संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी इंटरनॅशनल अॅडव्हान्स रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटर्ल्जी अॅन्ड न्यू मटेरियल, एआरसीआय, हैदराबाद हे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे स्वायत्त संशोधन आणि विकास केंद्र आणि नोएडाचे वेहंत टेक्नोलॉजी यांनी मिळून KritiScan® युव्ही सामान निर्जंतुक प्रणाली विकसित केली आहे. सरकत्या पट्ट्यावरून जाणारे सामान,युव्हीसी कन्व्हेयर प्रणाली काही सेकंदातच प्रभावीपणे निर्जंतुक करू शकते आणि विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानक, हॉटेल, व्यावसायिक आणि खासगी आस्थापने अशा ठिकाणी सामान निर्जंतुक करण्याकरिता वापरण्यासाठी सुयोग्य आहे.
युव्हीसी आधारित निर्जंतुकीकरण प्रणाली जलद निर्जंतुकीकरण क्षमतेसाठी ओळखली जाते. ही प्रक्रिया कोरडी आणि रसायन मुक्त असते.
कृतीस्कान युव्ही अत्याधुनिक सामान निर्जंतुकीकरण प्रणालीत वापरण्यात आलेला युव्हीसी लॅम्प आच्छादित असतो, त्यामुळे कर्मचारी किंवा प्रवाशांना इजा पोहोचण्याची शक्यता नाही. मात्र युव्हीसी स्त्रोत सुरु असताना मानवी हस्तक्षेप टाळण्याचा सल्ला दिला गेला आहे.
कोविड-19 च्या काळात जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी वेहंत टेक्नोलॉजी अविरत काम करत आहे. प्रवाशांचे सामान हे संसर्ग पसरण्याचे माध्यम असू शकते हे लक्षात घेऊन एआरसीआयच्या सहयोगाने KritiScan®युव्ही सामान निर्जंतुकीकरण प्रणाली विकसित केल्याचे वेहंत टेक्नोलॉजीचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल बारदेजा यांनी म्हटले आहे.
कोविड-19 च्या काळात प्रवास सुरक्षित करणाऱ्या अशा नाविन्य पूर्ण उपक्रमामुळे आरोग्य विषयक खबरदारी घेत आर्थिक विकासालाही गती मिळणार असल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव आशुतोष शर्मा यांनी म्हटले आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0036RSB2RJE.jpg)
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004MV0Y3LOA.jpg)
नेहमीच्या, हाती घेऊन वापरण्याच्या निर्जंतुक तंत्राच्या तुलनेत ही यंत्रणा, 8 सेकंदात प्रभावीपणे सामान निर्जंतुक करू शकते.
S.Thakur/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1639336)
Visitor Counter : 233