रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

वाहन क्रमांक आणि नोंदणी पाटीच्या रंगाबद्दल परिवहन मंत्रालयाने स्पष्टतेसाठी अधिसूचना केली जारी

प्रविष्टि तिथि: 16 JUL 2020 6:53PM by PIB Mumbai

 

 रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहनांवर नोंदणी चिन्हांनी नेमणूक या प्रकरणातील विसंगती सुधारण्यासाठी 14 जुलै 2020 रोजी, कार्यालयीन आदेश 2339 (ई) ही अधिसूचना जारी केली आहे.

जेणेकरून अंकांचा रंग, त्यांचा वेगवेगळा वर्ग आणि वाहनांच्या श्रेणीच्या नोंदणी पाटीचा मागील भाग स्पष्ट होईलअशा प्रकारे त्यांची मांडणी करावी अशी अधिसूचना केवळ स्पष्टता सक्षम करण्यासाठी देण्यात आली आहे आणि पाट्यांबाबत नव्याने काहीही सांगण्यात आलेले नाही.

यापूर्वी 12 जून 1989 रोजी कार्यालयीन आदेश 444 (ई) नुसार, मंत्रालयाने मोटार वाहन कायद्याच्या 1988 (1988 च्या 59) च्या कलम 41 मधील पोटकलम (6) अन्वये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहनांवर वेगवेगळे नोंदणी चिन्ह निर्धारित करून दिले होते.

त्यानंतर, मंत्रालयाने विस्तारित कार्यालयीन आदेश 827 (ई) 11 नोव्हेंबर, 1992 मधील सुधारणा करून 12 जून 1989  रोजी एसओ 444 (ई), नुसार, गाड्यांच्या प्रकारानुसार, दर्जानुसार त्यांचे अल्फा क्रमांक आणि नोंदणी क्रमांकाच्या पाटीचा रंग निर्धारित केला होता. पुढे, मंत्रालयाने विस्तारित सामान्य कार्यालयीन नियम 901 (ई) ता. 13/12/2001  नुसार, वाहनांच्या परिवहन आणि बिगर परिवहन वर्गासाठी नोंदणी पाटीचा रंग निर्धारित केला.

या प्रकरणातील दुरुस्ती मंत्रालयाच्या निदर्शनास आली, ते पाहता विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या वाहनांवरील नोंदणी चिन्हे कार्यालयीन आदेश 444 (ई) 12जून 1989जारी केले होते. ज्यामधील काही अस्पष्टता लक्षात आल्या. त्यामुळे स्पष्टता सक्षम करण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

***

B.Gokhale/S.Sheikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1639133) आगंतुक पटल : 294
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Tamil , Telugu