विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जैवतंत्रज्ञान विभागाचा कोविड-19 वरील लस ZyCov-Dला पाठिंबा, रचना आणि विकास Zydus कडून, वापरासाठी प्रयोगशालेय चाचणी टप्पा I/II सुरू होणार


अभ्यासाद्वारे लसीची सुरक्षितता, सहनशीलता आणि रोगप्रतिकारक क्षमतेचे मूल्यांकन केले जाईल

Posted On: 16 JUL 2020 3:23AM by PIB Mumbai

 

जैवतंत्रज्ञान औद्योगिक संशोधन सहाय्य परिषद चालवित असलेल्या राष्ट्रीय जैवऔषधी मोहिमेच्या अंतर्गत भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचा पाठिंबा असलेले लस संशोधन आता वैद्यकीय चाचण्यांपर्यंत पोहोचले आहे.

'बीआयआरएसी'ने घोषित केले आहे की ZyCoV-D, प्लाझमिड डीएनए लसीची रचना आणि विकास, Zydusने केला आहे आणि अंशतः जैवतंत्रज्ञान विभागाच्या वतीने अर्थसहाय्य देण्यात आले आहे, भारत सरकारने आरोग्यपूर्ण विषयांमधील टप्पा I/IIच्या प्रयोगशाळेतील चाचण्या सुरू केल्या आहेत. कोविड-19ची पहिली स्वदेशी विकसित लस तयार करून ती मानवांमध्ये दिली जाईल.

चाचणीच्या घेण्यात येणाऱ्या I/II  टप्प्यामध्ये बहुकेंद्रित अभ्यास लसीच्या सुरक्षेचे, सहनशक्ती आणि प्रतिकारक्षमता यांचे मूल्यांकन केले जाईल. फेब्रुवारी 2020 मध्ये कोविड-19चा वेगवान लस विकास कार्यक्रम सुरू झाल्यापासून या लसीची मानवी मात्रा, हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव आणि बीआयआरएसीच्या अध्यक्ष डॉ. रेणू स्वरूप  म्हणाल्या, "राष्ट्रीय जैवऔषधी मोहिमेअंतर्गत कोविड-19च्या देशी लसीच्या जलद विकासाकडे लक्ष वेधण्यासाठी भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने Zydus सोबत भागीदारी केली आहे. Zydus बरोबर असलेली ही भागीदारी म्हणजे देशातील या महाभयंकर साथीच्या आजाराला सामोरे जाण्यासाठी लस देण्याची गरज आहे, ज्यामुळे एक अब्ज लोकांना धोका निर्माण झाला आहे. अशा संशोधनाच्या प्रयत्नांमुळे देशाला भविष्यातील रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून प्रतिबंधात्मक योजना विकसित करण्यासाठी मदत होऊ शकेल आणि नवीन उत्पादनांना वास्तववादी आणि समाजातील प्रश्नांमध्ये बदल करणारी एक परिसंस्था तयार करण्याबाबत, विकास करणारी, पर्यावरणपूरक यंत्रणा निर्माण करण्याच्या सरकारच्या उद्देशाचे उदाहरण समोर राहील."

त्यांनी असेही नमूद केले की, "Zydusने स्वदेशी विकसित केलेल्या लसीची  प्रयोगशाळेतील मानवी चाचण्या सुरू केल्या असल्यामुळे आत्मनिर्भर भारतासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आम्हाला आशा आहे की, लसीचे सकारात्मक दाखले मिळतील, जसे ते प्रयोगशाळेतील चाचण्यांपूर्वी मिळाले होते, आणि आम्हाला ते सुरक्षितही वाटले होते, रोग प्रतिकारक शक्ती असलेले तसेच चांगली सहनशक्ती असल्याचेही यातून दिसून आले आहे. भारतीय वैज्ञानिक संशोधनासाठी ही मोठी झेप ठरेल."

लसीच्या विकासाबद्दल Zydus कॅडिलाचे अध्यक्ष पंकज आर पटेल म्हणाले, "देशभर परसरलेल्या या साथीच्या आजारामध्ये आणि देशातील आरोग्य विषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी ही  लस म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. कोविड-19 पासून प्रतिबंधात्मक अशी लस संशोधित करताना आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही बीआयआरएसी आणि भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे आभारी आहोत."

 

ZyCoV-D बाबत-

प्रयोगशाळेतील प्रयोगपूर्व अवस्थेत लस उंदिर, डुक्कर, ससे यासारख्या अनेक प्राण्यांमध्ये तीव्र प्रतिकारशक्ती दर्शविणारी आढळली आहे. लसीमुळे रोगप्रतिकार करणाऱ्या पेशी तयार होण्यास मदत झाली. वन्य प्रकारातील विषाणू समूळ नष्ट करण्यास लस सक्षम आहे आणि रुग्णाची संरक्षणात्मक क्षमता दर्शविते. सशांमध्ये माणसांनी घ्यायचा डोस तीन वेळा सुरक्षित आणि चांगल्याप्रकारे सहन केला आणि रोगप्रतिकारक असल्याचेही आढळले.

देशात कंपनीने ZyCoV-D निर्मितीसाठी नॉन रेप्लिकेटिंग आणि नॉन इंटिग्रेटिंग प्लाझमिडचा वापर करून अत्यंत सुरक्षित असा डीएनए व्हॅक्सिन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. यात कोणताही विषाणू आणि संसर्गाचे लक्षण आढळले नाही, यामुळे कमीतकमी जैवसुरक्षा गरजेनुसार (बीएसएल–1) सुलभरितीने लसीचे उत्पादन होऊ शकते. लशीची दीर्घकालीन टिकण्याची क्षमता बऱ्याच प्रमाणात वाढविण्यात आली आहे आणि खूप कमी तापमानाला ती ठेवण्याची गरज भासणार नाही, अशा प्रकारे तिची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे देशातील दुर्गम भागापर्यंत दळणवळण करणे सोपे होईल. त्यापुढेविषाणूमध्ये काही बदल आढळून आले तर वरील प्लॅटफॉर्मचा वापर करून दोन आठवड्यांमध्ये लसीमध्ये योग्य ते बदल द्रुतगतीने घडवून आणता येऊ शकतात, याद्वारे लसीची सुरक्षितता सुनिश्चित करता येऊ शकते. 

 

राष्ट्रीय जैवऔषधी मोहिम, डीबीटी विषयी :

वेगवान संशोधनासाठी, जैवऔषधींच्या लवकर विकासासाठी भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे (डीबीटी) उद्योग – शैक्षणिक सहयोगात्मक अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूर केलेल्या एकूण खर्चासाठी 250 अमेरिकी डॉलर आणि जागतिक बँकेकडून 50 टक्के अर्थसहाय घेऊन जैवतंत्रज्ञान औद्योगिक संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी) अंमलबजावणी करीत आहे. हा कार्यक्रम भारताच्या लोकसंख्येच्या आरोग्याचा दर्जा सुधारित करण्याच्या उद्देशाने परवडणारी उत्पादने देशापर्यंत पोचविण्यासाठी राबविला जात आहे. लस, वैद्यकीय उपकरणे, निदान आणि बायोथेअरपिस्ट ही देशातील क्लिनिकल चाचणी क्षमता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण वाढविण्यासाठी सर्वात महत्त्वाची क्षेत्रे आहेत.

 

बीआयआरएसी बाबत :

जैवतंत्रज्ञान औद्योगिक संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी) ही ना नफा तत्वावर काम करणारी (सेक्शन 8, शेड्युल बी) भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने (डीबीटी) निर्मिती केलेली सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आहे, आंतरसंस्था म्हणून उदयोन्मुख बायोटेक उपक्रम बळकट आणि सामर्थ्यवान बनविण्यासाठी सामरिक संशोधन आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संबंधित उत्पादन विकासाच्या गरजा लक्षात घेऊन याची निर्मिती करण्यात आली आहे. आणखी माहितीसाठी https://birac.nic.in  येथे भेट देता येईल.

 

Zydus बाबत :

Zydus कॅडिला, ही एक संशोधन करणारी जागतिक पातळीवरील औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. ही कंपनी संशोधन, विकसन, उत्पादन करते आणि कमी तीव्रतेची औषधे, बायोलॉजिकल औषध पद्धती आणि लसींचा समावेश असलेल्या आरोग्य उपचाराच्या विस्तृत श्रेणींचे विपणन देखील करते.

*****

S.Pophale/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1639052) Visitor Counter : 425