वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जून 2020 चा घाऊक किंमत निर्देशांक
Posted On:
14 JUL 2020 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2020
आर्थिक सल्लागार कार्यालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने जून, 2020 (तात्पुरता) आणि एप्रिल, 2020 (अंतिम) साठीचे भारतातील घाऊक किंमत निर्देशांक प्रसिद्ध केले आहेत.
घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) ची तात्पुरती आकडेवारी प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला (किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी) मागील महिन्याच्या दोन आठवड्यांच्या कालावधीसह प्रसिद्ध केली जाते आणि देशभरातील संस्थात्मक स्रोतांकडून आणि निवडक निर्मिती उद्योगाकडून प्राप्त आकडेवारीसह संकलित केली जाते.
चलनवाढ
मासिक डब्ल्यूपीआयवर आधारित महागाईचा वार्षिक दर जून, 2020 मध्ये (-1.18 %) (तात्पुरता) आहे, जो मागील वर्षीच्या याच महिन्यात (जून 2019) 2.02% होता.
विविध वस्तू गटांच्या निर्देशांकाचा सारांश खालीलप्रमाणे आहे: -
प्राथमिक वस्तू
जून 2020 मध्ये या प्रमुख गटासाठी निर्देशांक (2.28%) वाढून 139.3 (तात्पुरता) झाला, मे 2020 मध्ये हा निर्देशांक 136.2 (तात्पुरता) होता. मे, 2020 च्या तुलनेत कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (16.30%), खाद्य वस्तू (1.7%) आणि बिगर-खाद्य वस्तू (1.71%) च्या किंमती वाढल्या. मे 2020 च्या तुलनेत खनिजांच्या किंमती (-1.72%) कमी झाल्या.
इंधन आणि ऊर्जा
जून 2020 मध्ये या प्रमुख गटाचा निर्देशांक (5.50%) वाढून 88.3 (तात्पुरता) झाला, मे 2020 मध्ये हा निर्देशांक 83.7 (तात्पुरता) होता. मे 2020 च्या तुलनेत खनिज तेलांच्या समूहाच्या किंमती (12.54%) वाढल्या. कोळसा आणि विजेच्या किंमतीमध्ये काहीही बदल झाले नाहीत.
तयार उत्पादने
जून 2020 मध्ये या प्रमुख गटाचा निर्देशांक (0.42%) वाढून 118.6 (तात्पुरता) झाला, मे 2020 मध्ये हा निर्देशांक 118.1 (तात्पुरता) होता. मे 2020 च्या तुलनेत जून 2020 मध्ये तयार उत्पादनांच्या 22 एनआयसी दोन-अंकी गटांपैकी, अन्न उत्पादन; रेकॉर्ड केलेल्या माध्यमांचे मुद्रण आणि पुनरुत्पादन; तयार कपडे; रसायने आणि रासायनिक उत्पादने; औषधे, औषधी रासायनिक आणि वनस्पती उत्पादने; रबर आणि प्लास्टिक उत्पादने; इ. 13 गटांच्या किंमतींमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे.
तर, मे 2020 च्या तुलनेत जून महिन्यात पेय; तंबाखूजन्य पदार्थ; कापड; चामडे आणि संबंधित उत्पादने; लाकूड आणि लाकडाची आणि कॉर्कची उत्पादने; कागद आणि कागदी उत्पादने; यंत्रसामग्री आणि उपकरणे आणि फर्निचर यांच्या किंमतीमध्ये घसरण झाली आहे. मे, 2020 च्या तुलनेत जूनमध्ये संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टिकल उत्पादनांचे उत्पादन स्थिर आहे.
जून, 2020 मधील डब्ल्यूपीआयची आकडेवारी सुमारे 70 टक्के प्रतिसाद दराने संकलित केली आहे.
अन्नधान्यावर आधारित घाऊक किंमत निर्देशांक
प्राथमिक वस्तू गटातील ‘अन्न वस्तू’ आणि तयार उत्पादने गटातील ‘अन्न उत्पादने’ यांचा समावेश असलेल्या खाद्य निर्देशांक मे 2020 च्या 146.1 च्या तुलनेत जून, 2020 मध्ये 148.6 झाला आहे. अन्नधान्य गटाच्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दरात वाढ होऊन तो जून 3.05 टक्के राहिला. मे 2020 मध्ये हा दर 2.31 टक्के होता.
S.Thakur/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1638529)
Visitor Counter : 522