रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

स्थानिक कौशल्याचा उपयोग करत महामार्ग संरचना दर्जेदार करण्यासाठी 'एनएचएआय' अव्वल तंत्र संस्थांशी सहयोग आणि  भागीदारी करणार

Posted On: 13 JUL 2020 11:08PM by PIB Mumbai

 

जागतिक दर्जाचे महामार्ग जाळे पुरवण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून 'एनएचएआय'ने सर्व 'आयआयटी', 'एनआयटी' आणि नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी, आपल्याशी सहयोग करत जवळचा राष्ट्रीय महामार्ग पट्टा स्वेच्छेने, संस्थात्मक सामाजिक दायित्व म्हणून स्वीकारावा, यासाठी त्यांच्याशी संपर्क केला आहे. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या प्रतिभेचा, देशातल्या रस्ते संरचना सुधारण्यासाठी लाभ व्हावा, हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यासह संस्थाना स्थानिक आवश्यकता, भौगोलिक रचना, संसाधने क्षमता याविषयी उत्तम जाण असते आणि याचाच 'एनएचएआय' रस्ते बांधकाम करण्यापूर्वी, बांधकाम करण्यासाठी अशा विविध टप्प्यात उपयोग करू इच्छिते. या विकेंद्रित दृष्टीकोनामुळे निर्णय घेण्यात सहभागी होण्याची भावना निर्माण होण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी, प्रशिक्षणार्थीसाठीचा पर्याय आणि संशोधनासाठी क्षेत्रही उपलब्ध होणार आहे. संस्थेने रस्ता पट्ट्याचे दायित्व स्वीकारल्याने महत्वाच्या माहितीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला होऊन राष्ट्रीय महामार्गाची सुरक्षितता आणि दर्जा सुधारण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. संस्थेने पट्ट्याचे दायित्व स्वीकारल्याने वाहतूक कोंडी, अपघात प्रवण स्थळे तातडीने जाणणे, यासह स्थानिक समस्या दूर करण्यासाठी मदत होणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि अधिकारी यांच्यामार्फत स्थानिक समस्या दूर करण्यासाठी अधिक सक्षम बनणार आहेत. यामुळे 'एनएचएआय'ला, सध्याच्या आणि भविष्यातल्या प्रकल्पांसाठी स्थानिक गरजा जाणून घ्यायला, देखभाल सुधारायला आणि प्रवास सुखकर करायला, तसेच महामार्गालगत सुविधा विकसित करायला मदत होणार आहे. तसेच यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवाश्यांना अनुकूल आणि आनंददायी प्रवास अनुभवता येईल.

मोठ्या प्रमाणात 'आयआयटी', 'एनआयटी' आणि अभियांत्रिकी महाविद्यालये या योजनेत सहभागी होत असून 'एनएचएआय' अधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेच्या संचालकांशी सल्लामसलत सुरु केली आहे. या योजनेला संस्थात्मक रूप देण्यासाठी आणि देशातल्या रस्ते संरचनेत सुधारणा आणण्यासाठी 'एनएचएआय' आणि विविध संस्था यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या  करण्यात येत आहेत. 

*****

S.Pophale/N.Chitale/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1638457) Visitor Counter : 166