आदिवासी विकास मंत्रालय

जीओएएल प्रकल्पावर अनुसूचित जमाती मतदारसंघातील खासदारांच्या संवेदनशीलतेसाठी फेसबुक इंडियाच्या सहयोगाने आदिवासी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केला वेबिनार

Posted On: 10 JUL 2020 10:51PM by PIB Mumbai

 

आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या वतीने भारतातील अनुसूचित जमाती मतदारसंघातील खासदारांच्या संवेदनशीलतेसाठी फेसबुक इंडियाच्या माध्यमातून `गोईंग ऑनलाइन अँज लीडर्स प्रकल्प` (जीओएएल) विषयावर आज वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.  केंद्रिय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा, आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या केंद्रिय राज्यमंत्री श्रीमती रेणुका सिंग सरुता, संसदेचे अनेक सदस्य आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि फेसबुक इंडिया यांनी वेबिनारमध्ये भाग घेतला.

वेबिनारमध्ये बोलताना, श्री अर्जुन मुंडा म्हणाले की, गोईंग ऑनलाइन अँज लीडर्स (जीओएल) हे डिजिटल कोशल्य आणि मार्गदर्शक उपक्रम आहे, ज्यामुळे व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, राजकारण, कला आणि उद्योजकता या संबंधित क्षेत्रातील क्षेत्रातील प्रसिद्ध नेते आणि तज्ज्ञ डिजिटल यंत्रणेद्वारे अनुसूचित जमातीच्या तरुणांना वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करू शकणार आहेत. हा कार्यक्रम अनुसूचित जमातीच्या तरुणांना भविष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम करणार आहे. या उपक्रमात प्रामुख्याने आदिवासी भागात राहणाऱ्या तरुणांची क्षमता वाढविणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे जे त्यांच्यातील आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या उच्च आकांक्षा जागृत करण्यासाठी प्रेरित करेल, मार्गदर्शन करेल आणि प्रोत्साहित करेल. प्राप्त कौशल्य आणि क्षमतांमुळे त्यांच्यातील नेतृत्त्व कौशल्य वाढीस लागण्यासाठी मदत होऊ शकणार आहे, त्यांच्या समाजातील प्रश्न शोधणे, त्यावरील आव्हानांशी लढण्यासाठी उपाय शोधणे आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सामाजिक – आर्थिक स्थितीस मदत करतील. डिजिटल साक्षरता, जीवन कौशल्ये आणि नेतृत्त्व आणि उद्योजकता ही मार्गदर्शनपर कार्यक्रमाची प्रमुख क्षेत्र असतील.

आदिवासी तरूणांनी आपले आयुष्यातील ध्येय गाठण्यासाठी मोबाईल फोनचा एक माध्यम म्हणून वापर करावा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले. ते म्हणाले की त्यांनी फेसबुकसारख्या सोशल मिडियाला आपल्या जीवनातील उद्दिष्टांशी जोडले पाहिजे. जीओएल हा तरुणांसाठी संधी निर्माण करणारा उपक्रम असल्यामुळे, जीओएल हा मार्गदर्शक आणि विद्यार्थी यांच्यातील कौशल्यपूर्ण कल्पनांची देवाण – घेवाण करण्यासाठी एक दुवा असू शकेल, अशी अपेक्षा त्यांनी केली आहे.  

श्रीमती रेणुका सिंग सऊता यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे की आदिवासींमध्ये सर्जनशील क्षमता असूनही देशात ते एकटे पडले होते पण आता, गोल सारख्या डिजिटल माध्यमामुळे, ते देखील त्यांच्यातील कलाकौशल्यांची क्षमता दाखविण्यासाठी पुढे येऊ शकतील. आदिवासी जमातीतील लोकांनी डिजिटल व्यासपीठाकडे वळण्याची गरज आहे. त्यांनी आदिवासी महिलांना देखील मोठ्या संख्येने एकत्रितपणे पुढे येऊन आपले जीवनमान उंचावावे, असे आवाहन केले आहे.

जीओएल बाबत अनुसूचित जमातींच्या मतदार संघातील खासदारांनी देखील त्यांची मते आणि सूचना यावेळी मांडल्या.

डिजिटल तंत्रज्ञानामुळे कौशल्यपूर्ण आणि सक्षम बनवून आदिवासी समाजातील 5000 युवकांना उद्याचे नेते बनविण्यासाठी जीओएल (गोइंग ऑनलाइन अँज लीडर्स) हा उपक्रम आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या (एमओटीए) पुढाकाराने फेसबुक इंडियाच्या भागीदारीने सुरू करण्यात आला. ज्या लोकांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ओळखले जाते अशा उद्योगनक्षत्रातील (धोरणकर्ते आणि प्रभावशाली) 2500 नामांकित व्यक्ती, शिक्षक, कलाकार, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादि ओळखणे आणि त्यांना एकत्रित करणे हा जीओएल प्रकल्पाचा उद्देश आहे. या व्यक्ती संपूर्ण भारतातील आदिवासी तरुणांना वैयक्तिकरुत्या मार्गदर्शन करतील. एका विद्यार्थ्यास दोन मार्गदर्शक अशी याची आखणी केली गेली आहे.

प्रारंभिक, रचनात्मक टप्पे, मार्गदर्शक आणि विद्यार्थी यांची निवड, मार्गदर्शन, त्याची अंमलबजावणी, प्रशिक्षण, कामाचा अनुभव आणि आर्थिक आणि नेतृत्व कौशल्ये यांचा पाठपुरावा आदी मुद्यांनुसार या कार्यक्रमाची पूर्वतयारी आणि नियोजन विविध टप्प्यांसह करण्यात येणार आहे. या योजनेत तरुणांना पदवी मिळाल्यानंतरही त्यांना नोकऱ्या किंवा स्वयंरोजगार किंवा उद्योजकीय उपक्रमांसाठी सरकारी योजनांमधून मदतीचा हात करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमामध्ये गुणवत्तेची हमी, देखरेख, एकात्मता मूल्यांकन, आणि विश्लेषण करणे आणि सततच्या सुधारणेसाठी तंत्रज्ञान, निर्णयक्षमता आणि शाश्वतपणा अपेक्षित आहे.

मार्गदर्शक आणि विद्यार्थी हे 1 : 2 असे प्रमाण असावे, असा उद्देश आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी नऊ महिने किंवा 36 आठवडे बांधिल आहेत.

-1 महिना ते 7 महिने (28 आठवडे) – आदिवासी जमातीतील प्रशिक्षणार्थी मार्गदर्शकांशी जोडले जातील.

-8 महिने ते 9 महिने (8 आठवडे) – निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना नामांकित संस्थांमध्ये काम करण्याची संधी

स्वतःबद्दलची मूलभूत माहिती देऊन प्रशिक्षणार्थी किंवा मार्गदर्शक हे त्यांचे अर्ज http://goal.tribal.gov.in/ या पोर्टलवर भरू शकतात. कोणत्याही मार्गदर्शक किंवा प्रशिक्षणार्थ्याला आर्थिक मानधन दिले जाणार नाही. यामध्ये रस असणारे अनुसूचित युवक, facebook-goal@tribal.gov.in  या ठिकाणी त्यांना जीओएएल बाबत काही शंका असल्यास विचारू शकतात किंवा जीओएल पोर्टलवर `Contact Us` येथेही शंका विचारू शकतात.

आदिवासी जमातीमधील 18 ते 35 वयोगटातील युवक प्रशिक्षणार्थी म्हणून अर्ज करू शकतात. आदिवासी समाजातील सर्व तरुणांसाठी मग ते कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा भाग असोत वा नसो किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात असोत वा कोणतेही प्रशिक्षण घेत असले तरीसुद्धा हा उपक्रम त्यांच्यासाठी खुला आहे.

व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, राजकारण, कला, उद्योजकता किंवा अन्य देखील या क्षेत्रातील तज्ज्ञ हे आदिवासी युवकांना प्रोत्साहन देऊ शकतात, मार्गदर्शन आणि प्रेरित करू शकतात आणि ग्रामीण स्तरावर डीजीटल तंत्र वापरणाऱ्या तरूण नेत्यांना मार्गदर्शक होण्यासाठी प्रेरित करू शकतात. या कार्यक्रमासाठी संपूर्ण कालावधीसाठी मार्गदर्शकाकडून वेळेची वचनबद्धता आवश्यक असते. अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक हा आदिवासी समाजातील किंवा अनुसूचित समाजाची पार्श्वभूमी असलेलाच असावा, असे आवश्यक नाही.

आदिवासी कार्य मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालय  आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी सामान्य सेवा केंद्रांमधून (सीएससी) सक्षम नेटवर्क मिळविण्यासाठी सहकार्य केले आहे. आदिवासी समाजातील युवक त्यांच्या नजीकच्या सीएससी केंद्रामध्ये भेट देऊन या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात. आदिवासी युवकाची या कार्यक्रमासाठी निवड झाली की, त्यांच्याकडून एक वर्षासाठी इंटरनेट जोडणी असलेला स्मार्ट फोन पुरविला जाईल. फेसबुक मेसेंजर आणि वॉट्सअप यासारख्या व्हिडिओ पद्धतीचे तंत्रज्ञानाच्या मदतीने हा प्रकल्प डिजिटल पद्धतीने वितरित केला जाईल. या अप्लिकेशनच्या माध्यमातून मार्गदर्शक आणि प्रशिक्षक परस्पर संवाद साधू शकतील, आणि सर्व शिक्षण साहित्य डिजिटल माध्यमातून पुरविण्यात येईल.

प्रशिक्षणार्थींना पुढील फायदे मिळतील – एक वर्षाच्या इंटरनेट वापरासह स्मार्ट फोन, एमओटीए आणि फेसबुक यांच्या संयुक्त विद्यमाने सहभागाचे प्रमाणपत्र, मार्गदर्शकांकडून मान्यता पत्र, नामांकित खासगी किंवा सरकारी संस्थेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी, आणि  स्थानिक /राज्य / राष्ट्रीय / पातळीवर मान्यता, उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी संवादाची संधी आणि राज्य/राष्ट्रीय पातळीवर फेसबुक आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या कार्यक्रमांमध्ये प्राधान्य.

प्रशिक्षणार्थींना या कार्यक्रमांतर्गत पुढील मान्यता मिळतील – एमओटीए आणि फेसबुक यांच्याकडून सहभागाचे संयुक्त प्रमाणपत्र, उद्योजकता, व्यावसायिकता क्षेत्रातील उच्च दर्जाच्या प्रभावशाली व्यक्तींशी, गटाशी संवाद साधण्याची संधी, इद्यादी. एमओटीए आणि फेसबुक यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्राधान्य प्रवेश, मार्गदर्शक म्हणून पोर्टलवर माहिती दाखविली जाईल. आणि उद्योग आणि राजकीय नेत्यांना भेटण्याची संधी.

 

S.Tupe/S.Shaikh/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637898) Visitor Counter : 307