संरक्षण मंत्रालय

भारतीय हवाई दलाची ‘एसएएसओ’ परिषद

Posted On: 02 JUL 2020 10:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

 

भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ वायू सेना अधिका-यांच्या (एसएएसओ) परिषदेचे उद्घाटन दि. 2 जुलै, 2020 रोजी वायू सेना प्रमुख एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदौरिया यांच्या हस्ते करण्यात आले. कोविड-19 महामारीचा झालेला उद्रेक आणि सुरक्षा वातावरण यांचा विचार करून या परिषदेचे पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले.

वायूसेना प्रमुख भदौरिया यांनी भारतीय हवाई दलाचे अधिकारी आणि अधिनस्थ संघटना ज्या पद्धतीने कार्य करीत आहेत, त्याचे कौतुक केले. सद्यस्थितीत आणि आगामी भविष्यामध्ये ज्याप्रमाणे कार्य करण्याची आवश्यकता निर्माण होईल, त्याची पूर्तता करण्यासाठी हवाई दलाच्या सर्व जवानांना एकीकृत प्रशिक्षण देण्याच्या दिशेने जे प्रयत्न करण्यात आले, त्याबद्दल वायूसेना प्रमुखांनी प्रशंसा केली. एसएएसओ म्हणजेच भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ वायू सेना अधिका-यांनी मोहिमांच्या महत्वपूर्ण प्रणालीच्या सेवा क्षमतेमध्ये सुधारणा करण्याबरोबरच आपल्या कार्यवहनाच्या क्षमतांमध्ये वृद्धी करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. कोणत्याही प्रकारच्या युद्धस्थितीमध्ये भारतीय हवाई दलाला विजयी बनवण्यासाठी विद्यमान हवाई युद्ध साधनांसह आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या लढाऊ विमानांच्या कमाल कार्यवहनासाठी योग्य ती तयारी करण्यावर भर दिला.

भारतीय हवाई दलाच्या वरिष्ठ वायू सेना अधिका-यांची परिषद वर्षातून दोनवेळा होत असते. या दोन दिवसीय परिषदेचा समारोप 3 जुलै, 2020 रोजी होणार आहे. यामध्ये हवाई दलाची कार्यवहन क्षमता वाढवणे आणि विद्यमान परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्रीकृत प्रशिक्षणावर विशेष चर्चा होणार आहे.

 

* * *

S.Thakur/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636101) Visitor Counter : 171