रसायन आणि खते मंत्रालय

पल्स ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स सारख्या अत्यावश्यक वैद्यकीय सेवेतील साधनांच्या कोविड – 19 काळातील वाढत्या किंमतींवर एनपीपीएची देखरेख आणि देशात पुरेशा उपलब्धतेची सुनिश्चितता

Posted On: 02 JUL 2020 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

देशभर कोविड-19 साथीचा आजार पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील कोविड-19 च्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी गंभीर वैद्यकीय उपकरणांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सध्या सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय (एमओएच आणि एफडब्ल्यू) यांनी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांची यादी केली आहे आणि राष्ट्रीय औषधोपचार मूल्य निर्धारण प्राधिकरणाला (एनपीपीए) देशभरातील याची उपलब्धता सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.

ग्राहकांना किफायतशीर किंमतीमध्ये जीवनरक्षक औषधे किंवा उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. सर्व वैद्यकीय उपकरणे, औषधे म्हणून अधिसूचित केली गेली आहेत आणि औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचा कायदा 1940 च्या नियमनाच्या अंमलात आली आहेत आणि औषधे (किंमती नियंत्रण आदेश), 2013, 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांच्या किंमतींच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी एनपीपीएने डीपीसीओ 2013,अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांच्या वापरामध्ये (i) पल्स ऑक्सिमीटरच्या उत्पादक किंवा आयातदारांकडून किंमतीशी संबंधित माहिती मागवली आहे आणि (ii) ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरच्या 1 एप्रिल 2020 रोजी अस्तित्वात असलेल्या किंमती एक वर्षात दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढवू नयेत हे सुनिश्चित करणे. 

1 जुलै 2020 रोजी एनपीपीएमध्ये वैद्यकीय उपकरणे उद्योग संघटना आणि नागरी सामाजिक गट यांच्यासह भागधारकांचे मते जाणून घेतली, ज्यामध्ये यावर भर  देण्यात आला की अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे उत्पादित करणारे किंवा आयात करणारे या उपकरणांची उपलब्धता देशातील पुरेशा प्रमाणात सुनिश्चित करतील.  एक गोष्ट पुन्हा नमूद करण्यात आली की, सर्व वैद्यकीय उपकरणे डीपीसीओ, 2013 अंतर्गत किंमती नियमनात आहेत, अर्थात 1 एप्रिल 2020 च्या अनुशंगाने परिशिष्ट 20 अंतर्गत वैद्यकीय उपकरणांच्या किंमती वाढीवर लक्ष ठेवले जाईल. एनपीपीएच्या अध्यक्षांनी देखील उद्योग क्षेत्राला विनंती केली आहे की, हे नेहमीसारखा व्यवसाय नाही आणि सार्वजनिक आरोग्याच्या अत्यावश्यक सेवेत नफा कमावण्याचा विचार करण्याची देखील वेळ नाही. वैद्यकीय उपकरण निर्मिती उद्योगांच्या संघटनेने विनंती केली की एन–95 मास्कच्या उत्पादक किंवा आयातकर्त्यांप्रमाणे सध्याच्या गंभीर परिस्थितीत जनतेच्या हितासाठी अत्यावश्यक उपकरणांची किरकोळ किंमत कमी करण्यात यावी.

 

S.Thakur/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635960) Visitor Counter : 244