आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

ओदिशामधील आशा सेविका - कोविड संबंधित गैरसमजुती आणि भेदभाव दूर करण्यात अग्रणी


कोविड -19 विरुद्धच्या लढ्यात स्थानिक समुदायांसह जवळपास 46,000 हून अधिक आशा काम करत आहेत

Posted On: 02 JUL 2020 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जुलै 2020

ओदिशाच्या खुर्दा जिल्ह्यातील कांदले या गावी असलेली आशा मंजू जीना कोविड -19 संबंधित कामांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजातील व्यक्तींना अत्यावश्यक व इतर आरोग्य सेवां उपलब्ध करून देण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. समाजसेवेशी वचनबद्धता पाळताना मंजू यांनी महत्त्वपूर्ण सामाजिक दायित्वाची पूंजी जमविली  आहे, ज्यामुळे त्यांना कोविडशी संबंधित गैरसमज आणि परिणामी भेदभाव दूर करण्यासाठी प्रभावीपणे वाटाघाटी करण्यास सक्षम केले आहे. जेव्हा परत आलेल्या एका तरुण प्रवाशाला खेड्यात व त्याच्या घरात प्रवेश नाकारला गेला, तेव्हा मंजू यांनी स्वत: त्यात लक्ष देऊन समुदायाच्या वाईट वागणुकीकडे लक्ष वेधले. त्यांनी कोविड -19 विषयी समुदाय जागरूकता करून त्या तरुणाला गृह विलगीकरणात ठेवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले. या गृह विलगीकरणाच्या काळात मंजू यांनी त्याच्या आरोग्याची स्थिती आणि आरोग्यविषयक गरजा यावर नियमितपणे पाठपुरावा केला.

टाळेबंदी दरम्यान, मंजू यांनी इतर आवश्यक आरोग्य सेवां उपलब्ध करून दिल्या. संस्थात्मक प्रसूतीसाठी त्यांनी अनेक गर्भवती महिलांना प्रोत्साहन दिले व त्यांना सोबत केली. कर्तव्य बजावत असतानाच मंजू यांनी स्वतःच्या घरी फेस मास्क शिवून आपल्या गावातल्या गरिबांना ते वाटले. ओदिशामधील सुमारे 46,627 आशा ग्रामीण व शहरी भागातील कोविड -19 विरुद्धच्या लढाईत अग्रस्थानी असून स्थानिक आरोग्य सेवांवर लक्ष देत आहेत. त्या ग्रामीण भागातील गाव कल्याण समिती आणि शहरी भागातील महिला आरोग्य समिती यांच्यासोबत समुदाय सहभागातून एकत्रितपणे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडताना मास्क / फेस कव्हर्सच्या वापरास प्रोत्साहन, वारंवार हात धुण्याकडे लक्ष देणे, सुरक्षित शारीरिक अंतर नियमांचे पालन, कोविडच्या लक्षणांबद्दल जागरूकता वाढविणे इत्यादी कोविड प्रतिबंधित उपाययोजनांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांना या समितीच्या व्यासपीठाचा उपयोग होत आहे.

आरोग्य कथा सारख्या पत्रकांचे वितरण आणि पोस्टर वाटप करणे (ग्रामीण पातळीवर भित्तीपत्रिका) यासारख्या माहिती, शिक्षण आणि संवाद उपक्रमातून आशांनी व्यापक जनजागृती केली आहे.

 

S.Tupe/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1635926) Visitor Counter : 215