शिक्षण मंत्रालय

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एनसीईआरटीच्या वर्ष 2020-21 कार्यासाठी रूपरेषा प्रसिद्ध केली

Posted On: 24 JUN 2020 8:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2020


आत्मनिर्भर भारत अंतर्गत मूलभूत अक्षर आणि आंकडे शिक्षण मिशन स्थापन करण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने आणि शिक्षणकेंद्री दृष्टीकोनातून समग्र शिक्षणावर भर देण्याच्या दृष्टीने,  प्रभावी अंमलबजावणीसाठी एनसीईआरटीने कालबद्ध रीतीने आवश्यक संसाधने विकसित करणे आवश्यक आहे. 

यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक निष्कर्षात अर्थात  गुणवत्तेमध्ये आणि शिक्षणाच्या पातळीत सर्वांगीण सुधारणा होईल.  या आधारे  मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने एनसीईआरटीला 2020-21 मध्ये प्राधान्याने पुढील कामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

शिक्षणाचे निष्कर्ष  (गुणवत्ता)

एनसीईआरटीने तयार केलेल्या इयत्ता  1-10 साठी शिक्षणाच्या निष्कर्षांची अंमलबजावणी करण्यासाठी :

  1. इयत्ता 1 ते 5 साठी प्रत्त्येक श्रेणीसाठी  प्रत्येक विषयासाठी प्रत्येक शिक्षण निष्कर्ष स्पष्ट करणारे इन्फोग्राफिक्स/पोस्टर्स/सादरीकरण ऑक्टोबर 2020 पर्यंत तर 6 वी ते 12 च्या वर्गांसाठी. मार्च 2021 पर्यंत  पूर्ण करायचे आहे.
  2. 2. 1 ली ते 5 वी वर्गांच्या प्रत्येक श्रेणीतील शिक्षकांसाठी ऑनलाईन शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम डिसेंबर 2020 पर्यंत टप्प्याटप्प्याने  तर 6 वी ते 12 वी च्या वर्गांसाठी.जून 2021 पर्यंत टप्प्याटप्प्याने आयोजित करणे गरजेचे. 
  3. 3. कोविड 19 काळात विद्यार्थ्यांसाठी  संपूर्ण अभ्यासक्रमासाठी पूरक / पर्यायी शैक्षणिक शिक्षण साहित्य तयार करणे, विशेषत: डिजिटल / ऑनलाइन स्वरूप नसलेले  - 1 ते  5 इयत्तेसाठी डिसेंबर, 2020 पर्यंत तर  6 ते 12 इयत्तेसाठी जून 2021 पर्यंत टप्प्याटप्प्याने तयार करणे.
  4. 4. 1 ते 5 नोव्हेंबर 2020 पर्यंत 1 ते 5 इयत्तेसाठी  प्राविण्याच्या किमान दोन स्तरांवर प्रत्येक ग्रेडसाठी प्रत्येक विषयातील प्रत्येक शिक्षण निष्कर्ष मोजण्यासाठी किमान 10 मुद्दे / प्रश्न तयार करावेत , अन्य वर्गांसाठी  ही मुदत मार्च 2021 पर्यंत राहील.
  5. 5. एनएएस, 2017 च्या आधारावर निवडले गेलेले अवघड विषय  1 ते 5 वर्गांसाठी डिसेंबर 2020 पर्यंत सोप्या पद्धतीने तयार करणे आणि उर्वरित वर्गांसाठी  मार्च 2021 पर्यंत तयार करणे.

 

नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा  (एनसीएफ)

शालेय शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा  (एनसीएफ) देखील सुरू करण्यात आली आहे.  नवीन एनसीएफच्या अनुषंगाने एनसीईआरटीकडून पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केले  जाण्याची शक्यता आहे.  शालेय शिक्षणासाठी विषय तज्ज्ञ ही प्रक्रिया सुरू करतील आणि डिसेंबर 2020 पर्यंत अंतरिम अहवाल सादर करतील.

पाठ्यपुस्तकांची पुनर्र्चना  करताना हे निश्चित केले पाहिजे की मूलभूत सामग्रीशिवाय अन्य काही पाठ्यपुस्तकांमध्ये असणार नाही.  तसेच पाठ्यपुस्तकांचा   भार खूप जास्त आहे. सर्जनशील विचार, जीवन कौशल्य, भारतीय नीतिमूल्ये , कला आणि समाकलन इत्यादी अतिरिक्त क्षेत्रे एकत्रित करणे आवश्यक आहे. एनसीईआरटी नवीन पाठ्यपुस्तकांच्या संरचना आणि डिझाइनवर आधीपासूनच काम करायला सुरवात करेल, मात्र  नवीन एनसीएफच्या आधारे नवीन पाठ्यपुस्तके लिहिली जातील. मार्च 2021 पर्यंत नवीन एनसीएफ तयार होईल अशी अपेक्षा आहे.

आत्मनिर्भर भारत अंतर्गत, पीएम ई-विद्या साठी एनसीईआरटी  स्वयं प्रभा वाहिन्यांसाठी (1 वर्ग 1 वाहिनी) इयत्ता  1 - 12 ची सामग्री तयार करणे आणि या वर्षाच्या ऑगस्टपर्यंत वाहिनी (चॅनेल) सुरू करणे अपेक्षित आहे.


* * *

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634081) Visitor Counter : 299