नौवहन मंत्रालय

सी प्लेन विषयक प्रकल्पाचा मनसुख मांडवीय यांच्याकडून घेण्यात आला आढावा


16 सी प्लेन प्रकल्प लवकरच वास्तवात

Posted On: 23 JUN 2020 9:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जून 2020

केंद्रीय जहाज बांधणी राज्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज सी प्लेन प्रकल्पाचा ‘चाय पे चर्चा’ या बैठकीत आढावा घेतला. भारतीय सागरी क्षेत्रात परिवर्तन घडवण्यासाठी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा हा कल्पक आणि चिंतनपर बैठकांसाठीचा ‘चाय पे चर्चा’ हा मंच आहे.

देशातल्या प्रदीर्घ प्रवासासाठी सी प्लेन प्रकल्प वेगवान आणि सुकर प्रवासाचा पर्याय पुरवेल. आतापर्यंत उडान योजनेत प्रादेशिक कनेक्टीविटी मार्गांतर्गत सी प्लेन साठी 16 मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.  साबरमती आणि सरदार सरोवर-स्टॅच्यू ऑफ युनिटी मार्गाचा या 16 मार्गात समावेश असून या मार्गाचे जलविषयक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

साबरमती आणि नर्मदा नदी - स्टॅच्यू ऑफ युनिटी सी प्लेन मार्गामुळे वेळेची बचत होऊन पर्यटनालाही चालना मिळेल कारण या प्रवासादरम्यान नर्मदा खोरे आणि  स्टँच्यू ऑफ युनिटी यांचे उंचावरून विहंगम दृश्य पाहायला मिळणार आहे. वोटरड्रम अर्थात सी प्लेन उतरण्यासाठी आणि भरारी घेण्यासाठीच्या जागेचा  अमेरिका, कॅनडा,मालदीव आणि ऑस्ट्रेलिया यासारख्या देशातल्या पायाभूत संरचनेचा अभ्यास करून सी प्लेन चालवण्यासाठीच्या  भारतीय नियमांना योग्य ठरेल  असे भारतीय मॉडेल मांडावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

तपशीलवार चर्चा झाल्यानंतर साबरमती आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी मार्गावर ऑक्टोबर 2020 पर्यंत  सी प्लेन सुरु  होण्यासाठी सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी,एसडीसीएल आणि इन लँड वाटर वे अथोरिटी  ऑफ इंडिया, आयडब्ल्यूएआय यांनी पुढे येण्याच्या सूचना त्यांनी केल्या.  भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने आयडब्ल्यूएआय सी प्लेन मार्गांचे जल आणि  पाण्याच्या खोलीबाबत सप्टेंबर 2020 पर्यंत सर्वेक्षण करणार आहे. आयडब्ल्यूएआय इन लँड जल मार्गात सी प्लेन प्रकल्प व्यवस्थापन करेल तर एसडीसीएल सागरी क्षेत्रात व्यवस्थापन करेल. एसडीसीएल आणि आयडब्ल्यूएआय, जहाज बांधणी मंत्रालय, पर्यटन मंत्रालय आणि डीजीसीए यांच्याशी समन्वय ठेवेल.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1633796) Visitor Counter : 143