कृषी मंत्रालय

छोट्या शेतकऱ्यांच्या ’कृषी व्यवसाय कन्सोर्टियम’ (एसएफएसी) वर 10000 एफपीओ स्थापन करण्याची आणि ई-एनएएम प्लॅटफॉर्म बळकट करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी - नरेंद्र सिंह तोमर


एसएफएसीच्या 24 व्या व्यवस्थापन मंडळाच्या आणि 19 व्या वार्षिक सर्वसाधारण मंडळाच्या सभांना संबोधित करताना तोमर यांनी 1000 बाजारपेठा ई-एनएएमशी जोडल्याबद्दल केली प्रशंसा; 10000 कोटींपेक्षा जास्त शेतकरी आणि 1.30 लाखांहून अधिक व्यवसायांची ई-एनएममध्ये नोंदणी

Posted On: 12 JUN 2020 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2020

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास आणि पंचायती राजमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रात क्रांतिकारक सुधारणा केल्या असून 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्याच्या घोषणेचा यात समावेश आहे. हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी छोट्या शेतकरी ’कृषिव्यवसाय कन्सोर्टियम (एसएफएसी) वर आहे, जी सध्याच्या परिस्थितीत ई-एनएएम मंचाला बळकट करण्यासाठी देखील जबाबदार आहे. एसएफएसीच्या स्थापनेनंतर संस्थात्मक आणि खासगी गुंतवणूकीत बरीच प्रगती झाली आहे.

एसएफएसीच्या 24 व्या व्यवस्थापन मंडळाच्या आणि 19 व्या वार्षिक सर्वसाधारण मंडळाच्या सभांना संबोधित करताना तोमर यांनी एसएफएसी टीमचे दोन टप्प्यांत 1000 बाजारपेठा ई-एनएएमशी जोडल्याबद्दल अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की मंच निर्माण करण्याचे उद्दीष्ट साध्य केले पाहिजे. आतापर्यंत ई-एनएएम मंचावर  एक लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.  1.66  कोटींपेक्षा जास्त शेतकरी आणि 1.30 लाखाहून अधिक व्यवसायांनी  ई-एनएएम  सुरू झाल्यापासून नोंदणी केली आहे. तोमर म्हणाले की, सुधारणांचा  परिणाम म्हणून उत्पादनांची विक्री सुलभ करणे आणि पारदर्शकतेसह करणे , शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव आणि या मंचावर  त्यांना थेट प्रवेश सुनिश्चित करणे हे आपल्यासमोर आव्हान आहे. लॉकडाऊन कालावधीतही शेतक-यांनी मोठ्या समर्पित वृत्तीने कापणीचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना मदत केल्याबद्दल एसएफएसीचे अभिनंदन केले पाहिजे.

तोमर म्हणाले की पूर्वी एसएफएसी अस्तित्त्वात असलेल्या योजनांच्या आधारे एफपीओ तयार करत असत, परंतु आज ही आनंदाची बाब आहे की पंतप्रधानांनी देशभरात 10 हजार एफपीओ स्थापन करण्याची घोषणा केली ज्यामुळे या कार्याला चालना मिळेल. एफपीओ केवळ स्थापन  करणे आवश्यक नाही तर त्यांनी त्यांची उद्दीष्ट साध्य करणे आवश्यक आहे. शेतकरी गटात एकत्र येतील, चर्चा होईल आणि प्रशिक्षण घेतील, त्यांचे उत्पादन वाढावे, त्यांनी विविध पिके घ्यावीत आणि कीटकनाशकांचा वापर कमी करण्याच्या पद्धतींबद्दल चर्चा करावी हे सुनिश्चित करण्यात त्यांची जबाबदारी वाढत आहे.  पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे  उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यानच्या काळात  कोविडची समस्या उभी ठाकली मात्र  कृषी मंत्रालयाची आणि शेतकऱ्यांची गती अजूनही कमी झालेली  नाही.एसएफएसी ने कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने  किसान रथ ऍप्प सुरू केल्याबद्दल नरेंद्र सिंह तोमर यांनी कौतुक केले.यामुळे लॉकडाऊन दरम्यान शेतमालाची वाहतुकीची समस्या कमी झाली. 

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane


 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1631271) Visitor Counter : 307