शिक्षण मंत्रालय

‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा प्रसार आणि मुलभूत कर्तव्याप्रती युवकांमधे जागरूकता निर्माण करण्यासाठी पंजाब केंद्रीय विद्यापीठाच्या ईबीएसबी क्लबने लघु व्हिडीओ केला जारी


28 राज्यातल्या 28 विद्यार्थ्यांनी सहभागी होत आपापल्या राज्याच्या प्रादेशिक भाषेत मुलभूत कर्तव्यांचा केला अनुवाद

Posted On: 31 MAY 2020 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2020


आपल्या मुलभूत कर्तव्यांप्रती युवकांना जागरूक करण्यासाठी पंजाब मधल्या सेन्ट्रल युनिवर्सिटी ऑफ पंजाब भटिंडाने (सीयुपीबी) ’ए रिमांयडर ऑन फंडामेंटल ड्युटी’ हा लघु व्हिडीओ जारी केला आहे. सीयुपीबी ईबीएसबी क्लबने हा व्हिडीओ ’एक भारत श्रेष्ठ भारत’अंतर्गत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार  आणि कुलगुरू प्रा.आर के कोहली  यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आहे. जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने आपल्या वैधानिक कर्तव्यांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देणे, कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे प्रत्येकाने पालन करावे यासाठी प्रोत्साहन देणे आणि ‘संकल्प से सिद्धी तक’ अभियानाचा एक भाग होण्यासाठी आवाहन करणे हा या व्हिडीओचा उद्देश आहे.

या व्हिडीओमधे, 28 राज्यातले,  28 सीयुपीबी ईबीएसबी क्लब विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले असून त्यांनी आपापल्या राज्याच्या प्रादेशिक भाषेत मुलभूत कर्तव्यांचा अनुवाद केला आहे.

https://twitter.com/EBSB_MHRD/status/1265896852232134656

Opening and Closing Shot of the Video

 

सीयुपीबीमधे 28 राज्यातले, 28 ईबीएसबी क्लब विद्यार्थी स्वयंसेवक आपापल्या प्रादेशिक भाषेत मुलभूत कर्तव्यांचा अनुवाद सादर करताना


* * *

B.Gokhale/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1628130) Visitor Counter : 314