संरक्षण मंत्रालय

आयएनएस कलिंग युद्धनौकेवर ‘अग्निप्रस्थ’ मिसाईल पार्क उभारण्यात येणार

Posted On: 29 MAY 2020 8:04PM by PIB Mumbai

 

आयएनएस कलिंग या युद्धनौकेवर  ‘अग्निप्रस्थ’ मिसाईल पार्क उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा शिलान्यास कमांडिंग अधिकारी राजेश देबनाथ यांच्या हस्ते काल करण्यात आला. यावेळी व्हाईस अडमिरल अतुल कुमार जैन, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम, एफओसी-इन-सी (ईस्ट) उपस्थित होते.

अग्निप्रस्थ’ मिसाईल पार्क आयएनएस कलिंगचे अधिकारी, नाविक आणि सहायक कर्मचारी यांना समर्पित करण्यात येणार आहे. 1981 मध्ये स्थापन झाल्यानंतर या आयएनएस युद्धनौकेसाठी ज्यांनी महत्वपूर्ण सेवा बजावली, त्यांना मानवंदना म्हणून हे उद्यान बनवण्यात येत आहे. आयएनएस कलिंगला 2018-19 मध्ये प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता, त्याचे स्मरण म्हणूनही या पार्कची निर्मिती करण्यात येत आहे.

आयएनएस कलिंग या युद्धनौकेच्या निर्मितीच्या कामाला 1981मध्ये प्रारंभ झाला. त्यावेळेपासूनच्या महत्वपूर्ण घडामोडींचा, वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक घटनांचा मागोवा या ‘अग्निप्रस्थ’ उद्यानामध्ये घेण्यात येणार आहे. या क्षेपणास्त्र उद्यानामध्ये मिसाईल आणि त्यांना पूरक म्हणून उपयोगी ठरणा-या जीएसई यांच्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहेत. या युद्धनौकेने वापरलेल्या आणि त्याचा आता काहीही उपयोग नाही, अशा सामानातून क्षेपणास्त्र, पाणबुडी यांच्या प्रतिकृती  तयार करण्यात येणार असून त्यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या पार्कमध्ये सर्वांच्या दृष्टीने मुख्य आकर्षण पी-70 ‘अॅमेटिस्ट’ याचे असणार आहे. पाण्याखाली जाणारे ‘अँटी-शिप’ क्षेपणास्त्र सर्वांना पहायले आवडेल. 1988 ते 91 या काळामध्ये जुन्या ‘चक्र’ (चार्ली-1 पाणबुडी) या पाणबुडीनेही सेवा दिली होती.

अग्निप्रस्थ’ मुळे शालेय मुले आणि नाविक दलाचे कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांना युद्धनौकेवरील क्षेपणास्त्र, तंत्रज्ञानविषयक माहिती एकाच स्थानी मिळू शकणार आहे. कलिंग युद्धनौकेने केलेल्या कार्याविषयी जिज्ञासूंना माहितीप्रेरणा आणि उत्तेजन मिळेल. तसेच युद्धनौकेने, तिथल्या कर्मचारी वर्गाने केलेल्या कामाविषयी अभिमानाची भावना सर्वांच्या मनात निर्माण होईल. आपल्याकडे असलेल्या आयुधांची उपलब्धता, त्यांची विश्वासार्हता आणि लक्ष्य गाठण्यासाठी कशाचीही पर्वा न करणा-या कर्मचारी वर्गाने दिलेल्या योगदानाचे महत्व अधोरेखित करण्याचे काम हे मिसाईल पार्क प्रत्येकवेळी करणार आहे.

M.Jaitly/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1627730) Visitor Counter : 245