विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

संशोधकांनी नोवेल कोरोना विषाणूंचे  केले कृत्रिम संवर्धन, औषध चाचणी आणि लस विकसित करण्यास ठरू शकते मदतगार

Posted On: 29 MAY 2020 4:00PM by PIB Mumbai

 

पेशीकामय अणि आण्विक जीवशास्त्र केंद्राने (सीसीएमबी) रूग्णांच्या नमुन्यांमधून कोरोना विषाणूचे (सार्स-कोव्ह -२) स्थिर संवर्धन केले आहे. सीसीएमबीमधील विषाणूशास्त्रज्ञांनी कित्येक पृथक्करणातून संक्रामक विषाणू वेगळे केले आहेत. प्रयोगशाळेत विषाणूचे संवर्धन करण्याची क्षमता ही सीसीएमबीला लस विकासासाठी आणि कोविड -19शी लढण्यासाठी संभाव्य औषधांच्या चाचणीच्या दिशेने कार्य करण्यास सक्षम करते.

नोवेल कोरोना विषाणू हा पेशींच्या पृष्ठभागावरील एसीई -2 संवेदी चेतातंतूंच्यामार्फत मानवी पेशीमध्ये प्रवेश करतो. सर्व पेशींमध्ये एसीई -2 संवेदी चेतातंतू नसतात. श्वसनमार्गामधील मानवी एपीथेलीअल पेशी एसीई -२ संवेदी चेतातंतू मोठ्या प्रमाणात व्यक्त करतात, ज्यामुळे संक्रमित रुग्णाला श्वसन रोग होतो. तथापि, आपण प्रयोगशाळेत मानवी  एपीथेलीअल पेशी वाढवू शकत नाही. “सध्या, मानवी उत्क्रांतीतून निर्माण झालेल्या प्राथमिक एपिथेलियल पेशी बर्‍याच पिढ्यांपासून प्रयोगशाळेत संवर्धित केल्या जात नाहीत ज्या विषाणूच्या सततच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण आहेत. त्याच वेळी, विषाणू संवर्धन करीत  असलेल्या प्रयोगशाळांना ‘जिवंत' पेशींची आवश्यकता आहे, असे सीसीएमबीचे प्रधान वैज्ञानिक डॉ. कृष्णन एच हर्षन यांनी सांगितले. ते वेरो पेशी (हिरव्या आफ्रिकन माकडातील मूत्रपिंड एपीथेलीअल पेशी) वापरतात, जे एसीई -2 प्रथिने व्यक्त करतात आणि पेशी विभागतात ज्यामुळे त्यांना अनिश्चित काळासाठी झपाट्याने वाढ होण्यास परवानगी मिळते.

पण भयानक जंतूचे संवर्धन का करावे ? जर आपण मोठ्या प्रमाणात विषाणूचे संवर्धन केले आणि त्यांना निष्क्रिय केले तर मग निष्क्रिय विषाणू लस म्हणून ते वापरले जाऊ शकतात. एकदा आपण निष्क्रीय विषाणू लस दिल्यावर मानवी रोगप्रतिकारक शक्ती जंतूविरोधात -विशिष्ट प्रतिपिंडे तयार करते. उष्णता किंवा रासायनिक मार्गाने सुद्धा कोणी विषाणू निष्क्रिय करू शकते. निष्क्रिय विषाणू प्रतिपिंडांच्या म्हणजेच अँटीबॉडी प्रतिसादास कारणीभूत ठरू शकतो, परंतु संसर्गित होत नाही आणि आपल्याला आजारपण देत नाही कारण ते पुनरुत्पादन करू शकत नाहीत.

अँटीबॉडीज किंवा अँटीडॉट्सच्या विकासासाठी, विषाणूचे संवर्धन महत्त्वपूर्ण आहे. निष्क्रिय विषाणू मानवा व्यतिरिक्त इतर सस्तन प्राण्यांमध्ये अँटीबॉडी (प्रतिपिंड) प्रतिसादास कारणीभूत ठरू शकतात.

अ‍ॅन्टीबॉडी प्रतिसादाच्या कार्यक्षमतेसाठी अशा प्रकारच्या प्राण्यांवर सध्या चाचणी सुरू आहे. मानव सोडून इतर प्राण्यांमध्ये तयार केलेली प्रतिपिंडे शुद्ध केली जाऊ शकतात, त्यांच्यावर प्रक्रिया करून संग्रहित पण केली जाऊ शकतात. संसर्गग्रस्त रूग्णांसाठी अँटीबॉडीजचा उपचारात्मक हस्तक्षेप म्हणून वापर केला जाऊ शकतो. अशा अँटीबॉडीज मनुष्यात लसीद्वारे दिल्यास विषाणू विरोधात प्रतिसाद देतात आणि संसर्ग मर्यादित ठेवण्याची क्षमता त्यांच्यात असू शकते. अँटीबॉडीज शरीरात सोडल्यामुळे लसीप्रमाणे प्रतिकारशक्ती मिळत नाही, परंतु विषाणूविरूद्ध अँटी डॉट्स म्हणून ते मानले जाऊ शकते.

हे विषाणू संवर्धन औषध चाचणी प्रक्रियेत देखील उपयुक्त ठरू शकते. संभाव्य औषधांच्या कार्यक्षमतेसाठी परीक्षानळीत विषाणूविरूद्ध चाचणी केली जाऊ शकते.

कोरोना विषाणू वाढविण्यासाठी वेरो पेशींचा वापर करून, सीसीएमबी आता वेगवेगळ्या प्रदेशांमधून विषाणू वेगळे ठेवण्यासाठी आणि राखण्यासाठीच्या स्थितीत आहे. सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा म्हणाले की, आम्ही सक्रिय होऊ शकणाऱ्या मोठ्या प्रमाणात विषाणू तयार करण्याच्या दिशेने कार्य करीत आहोत आणि लसीचा विकास आणि अँटीबॉडी उत्पादनामध्ये याचा उपयोग केला जाऊ शकतो. सीसीएमबीने या विषाणू संवर्धनाचा वापर करून संरक्षण संशोधन विकास संस्थेसारख्या (डीआरडीओ) इतर भागीदारांसह संभाव्य औषधांची चाचणीही सुरू केली आहे.

डॉ. मिश्रा म्हणाले, “आम्हाला अशी आशा आहे की अशा प्रकारच्या यंत्रणेची स्थापना या महासंकटाविरूद्ध लढाईसाठी तसेच भविष्यातील तयारीसाठी उपयुक्त स्त्रोत ठरण्यासाठी अनेक संशोधन संस्था आणि खासगी कंपन्यांमध्ये केली जाईल.”

M.Jaitly/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1627644) Visitor Counter : 482