उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी जलशक्ती मंत्रालय आणि नीती आयोगाला आंध्रप्रदेश मधील उदयगिरीसाठी पेयजल प्रकल्पाच्या संभाव्यतेचा अभ्यास करण्यास सांगितले


उपराष्ट्रपतींनी प्रदेशातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली

Posted On: 25 MAY 2020 6:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मे 2020


उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी आज नीती आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, पेयजल आणि स्वच्छता सचिव परमेश्वरन अय्यर आणि जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान सचिव यु. पी. सिंग यांच्या सोबत बैठक घेऊन आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त उदयगिरी परिसरातील पिण्याचे पाणी आणि सिंचनाची गरज कशाप्रकारे पूर्ण करता येईल याविषयी चर्चा केली. उपराष्ट्रपतींनी त्यांना या भागातील लोकांच्या समस्या सांगितल्या.

अलीकडच्याच काळात उपराष्ट्रपतींनी उदयगिरी मतदार संघातील लोकांसोबत संवाद साधला होता, आता उपराष्ट्रपती असलेले वैंकय्या नायडू याच मतदार संघातून 1978 साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. या भागातील सर्वसाधारण माहिती देताना लोकांनी उपराष्ट्रपतींना सांगितले की, या भागतील भूजल पातळी खूपच खालावली आहे, बहुतांश तलाव/बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत आणि विविध पाणीपुरवठा योजना या भागातील पाण्याची आवश्यकता पूर्ण करू शकत नाहीत. पुरेसा पाऊस न झालेलं हे सलग सातवे वर्ष आहे असे ही त्यांनी सांगितले. त्यांच्यापैकी बहुतेकांनी नायडू यांना कृष्णा खोरे किंवा सोमसीला प्रकल्पातून पाणी मिळण्याचे मार्ग शोधण्याची विनंती केली.

उपराष्ट्रपतींसोबत झालेल्या आजच्या चर्चेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते आंध्रप्रदेश सरकारसह चर्चेनंतर विविध पर्याय शोधतील आणि  सर्वात संभाव्य पर्यायाची निवड करतील. 

उपराष्ट्रपतींनी जलसंपदा सचिवांना केंद्रीय जल आयोगाशी चर्चा करून तांत्रिक संभाव्यता शोधण्याचा सल्ला दिला. जल ग्रिड प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंकट कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या सध्या सुरु असलेल्या विविध प्रयत्नांचा आणि सविस्तर प्रकल्प अहवालाचा (डीपीआर) अभ्यास केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सुचवले.

प्राथमिक आढावा घेतल्यानंतर उपराष्ट्रपतींनी जलशक्ती मंत्रालय तसेच नीती आयोग व केंद्रीय जल आयोग यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीमंडळ या भागाला भेट देऊ शकेल आणि भूमीगत वास्तव समजून पुढील मार्ग शोधण्यासाठी संबंधित भागधारकांशी संवाद साधू शकेल. असा सल्ला उपराष्ट्रपतींनी दिला.


* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626759) Visitor Counter : 202