ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्रीय गोदाम महामंडळाची आजवरची सर्वात मोठी, म्हणजेच सुमारे 1710 कोटी रुपयांची उलाढाल, 35.77 कोटी रुपयांचा अंतरिम लाभांश केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे सुपूर्द

Posted On: 22 MAY 2020 8:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2020

 

केंद्रीय गोदाम महामंडळाने (CWC)वर्ष 2019-20 या काळात आपली आजवरची सर्वात मोठी, म्हणजे, सुमारे 1710 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. केंद्रीय गोदाम महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अरुणकुमार श्रीवास्तव, यांनी आज या उलाढालीच्या अंतरिम लाभांशाचा 35.77 कोटी रुपयांचा धनादेश  केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, यांच्याकडे सुपूर्द केला.  CWC च्या या उत्तम कामगिरीचे यावेळी पासवान यांनी कौतुक केले.

केंद्रीय गोदाम महामंडळाने वर्ष 2019-20 साठी मिळालेल्या एकूण भांडवलाच्या  95.53 टक्के दराने अंतरिम लाभांश निश्चित केला आहे, गेल्या वर्षी हा 72.20% इतका होता. एकूण 64.98 कोटी लाभांशांपैकी केंद्र सरकारचा वाटा 35.77 रुपये इतका आहे, कारण केंद्र सरकार 55% इक्विटी भागधारक आहे. वर्ष 2019-20 चा अंतिम लाभांश भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केला जाईल. 


* * *

M.Jaitly/R.Aghor/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1626210) Visitor Counter : 134